पुणे : दरोड्याच्या घटनेवरुन पुण्यात चोर पोलिसांचा प्रत्यक्ष थरार रस्त्यावर पाहायला मिळाला आहे. या घटनेने पुण्यातील भोर पोलिसांनी(Police)  केलेल्या कारवाईची शहरात चांगलीच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अपघात, ड्रग्ज आणि गुन्हेगारीच्या घटनांनी पुणे (Pune) शहर हादरुन गेलं आहे. तर, विधिमंडळाच्या अधिवेशनातही आज पुण्यातील पोर्शे कार अपघात आणि ड्रग्ज प्रकरणावरुन खडाजंगी पाहायला मिळाली. त्यामुळे, पुण्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असून गुन्हेगारीच्या प्रत्येक घटनेवर कारवाईला वेग आला आहे. त्यातच, आज सकाळी तळेगाव-दाभाडे येथील सराफाच्या दुकानावर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन ताब्यात घेतलं आहे.  


पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करून पळून जाणाऱ्या दरोडेखोरांना भोर-पोलिसांनी वडगाव डाळ हद्दीतून सिनेस्टाईल पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे. या घटनेत पाच पैकी 2 जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून तिघांनी पोलिसांना गाडीतून उतरून परिसरातील डोंगराच्या दिशेने काढला पळ काढला. तळेगाव दाभाडे येथे सकाळी एका सराफाच्या दुकानात 5 आरोपींनी दरोड्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नागरिक आल्याने त्यांचा प्रयत्न फसला आणि त्यांनी त्या ठिकाणाहून पलायन केले होते. 


दरम्यान, याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी आरोपींच्या मागावर पथकं रवाना केली होती, पाचही आरोपी एका इनोव्हा मोटारीतून भोरकडे आल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी भोर पोलिसांना दिली होती. त्यानंतर, भोर पोलिसांनी पाठलाग करुन दरोडेखोरांना ताब्यात घेतलं.


हेही वाचा


आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'


धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण