कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
आपल्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांना कर्कश हॉर्न बसवून नाहक ध्वनीप्रदुषण केले जाते. स्टाईल मारण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी असे प्रकार केले जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगावस्तरापासून ते महानगर मुंबईतही अशा हॉर्नकर्कश आणि सायलेन्सरधारक वाहनांची कमतरता नाही. विशेष म्हणजे पोलिसांकडून इशारा देऊनही ही वाहने ध्वनीप्रदुषण करताना दिसून येतात.
ध्वनी प्रदूषण करणाऱ्या अशा कर्कश हॉर्न व सायलेन्सरवर आता मुंबई वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या कर्कश हॉर्न व सायलन्सर प्रतिकात्मरित्या पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
वरळी वाहतूक पोलिस मुख्यालय येथील वरळी मैदानात आज दुपारी 3 वाजता पोलिसांकडून सामूहिकरित्या कारवाई करण्यात आली. त्यानुसार, बुलडोझर खाली हे हॉर्न चिरडण्यात आले आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांनी वरळी येथील मैदानात आत्तापर्यंत जमा केलेल्या कर्कश हॉर्न व सायलेन्सर सामूहिकरित्या नष्ट केले आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या ह्या कारवाईचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत, त्यामुळे इतर कर्कश हॉर्नधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.