चेन्नईचा संघ : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, मिचेल सँटनर, लुंगी एन्गिडी, कर्ण शर्मा, कृष्णप्पा गौतम, सॅम करन, जेसन बेहरेंड्रॉफ, इम्रान ताहिर, भगत शर्मा, हरिशंकर रेड्डी, सी. हरी निशांत, नारायण जगदीशन, के. एम. आसिफ, आर. साईकिशोर, भगत वर्मा.
CSK vs DC : चेन्नईचे दिल्लीला 189 धावांचे आव्हान, सुरेश रैनाचे दमदार अर्धशतक
CSK vs DC Live IPL 2021 : डावखुरा फलंदाज सुरेश रैनाच्या (54)अर्धशतकाच्या जोरावर वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 14व्या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्लीला 189 धावांचे लक्ष्य दिले आहे.
IPL 2021 CSK vs DC Live: आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकलेल्या दिल्लीने प्रथम चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण दिलं होतं. सुरेश रैनाच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 7 बाद 188 धावा उभारल्या आहेत. यात सॅम करन आणि मोईन अली यांनीही भरीव योगदान दिलंय.
चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड सलामी उतरले. मात्र, दुसऱ्याच षटकात फाफ डु प्लेसिसला आवेश खानने शून्यावर माघारी धाडले. त्याच्या पुढच्याच षटकात ख्रिस वोक्सने ऋतुराजला 5 धावांवर बाद केलं. त्यानंतर सुरेश रैना आणि मोईन अली यांनी डाव सावरत सुरेख खेळी केली. मोईन अलीने नवव्या षटकात अश्विनला लागोपाठ दोन षटकार ठोकले. मात्र, या षटकारानंतर अश्विनने त्याला बाद केलं. अलीने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावांची खेळी केली.
त्यानंतर आलेल्या अंबाती रायुडू आणि सुरेश रैनाने तेराव्या षटकात संघाला चांगल्या स्थितीत आणले. टॉम करनने या रैना-रायुडूची भागीदारी तोडली. रायडू मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने 23 धावा केल्या. 16 व्या षटकात रैनाही धावबाद झाला. आयपीएलचा मागील हंगाम न खेळलेल्या रैनाने दमदार पुनरागमन करत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 54 धावांची खेळी केली. धोनीने मात्र आज निराशा केली. आवेश खानने त्याला शून्यावर बाद केलं. धोनी बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांनी चांगली भागिदारी केली. करनने 15 चेंडूत 34 धावांची खेळी केली तर जडेजा 26 धावांवर नाबाद राहिला. दिल्लीकडून ख्रिस वोक्स आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 2 तर, अश्विन आणि टॉम करन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
दिल्लीचा संघ : ऋषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, पृथ्वी शॉ, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अक्षर पटेल, अमित मिश्रा, उमेश यादव, कॅगिसो रबाडा, आनरिख नॉर्किए, शिम्रॉन हेटमायर, टॉम करन, सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, आवेश खान, रिपल पटेल, प्रवीण दुबे, लुकमन मेरिवाला, एम. सिद्धार्थ, विष्णू विनोद, ललित यादव.