एक्स्प्लोर

IPL 2023 Transfers : आगामी आयपीएलला पॅट कमिन्ससह मिशेल स्टार्कसारखे दिग्गज मुकणार? समोर आली महत्त्वाची माहिती

IPL 2023 : मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क आयपीएल 2023 चा भाग असणार नाहीत. त्यांच्यासह बरेच दिग्गज या स्पर्धेला मुकणार आहेत.

IPL 2023 Auction : आयपीएल (IPL 2023) स्पर्धेसाठी मिनी लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. त्यापूर्वी महत्त्वाची माहिती समोर येत असून बरेच दिग्गज यंदा स्पर्धेला मुकणार असल्याचं समोर येत आहे. आयपीएल संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम यादी बीसीसीआयला द्यायची असून त्यामध्ये रिटेन केलेले आणि रिलीज केलेले खेळाडू सांगायचे आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सह बऱ्याच संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची अंतिम यादी तयार केली आहे. 

या दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क आयपीएल 2023 चा भाग असणार नाहीत, असं समोर येत आहे. पॅट कमिन्स हा कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. मिचेल स्टार्क आयपीएल मेगा लिलाव 2022 चा भाग नव्हता, त्यामुळे तो सध्या कोणत्याही संघाचा भाग नाही. याशिवाय गुजरात टायटन्सने मॅथ्यू वेडला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान तो खेळणार की नाही याबद्दल नेमकी माहिती समोर आलेली नाही. तसंच मुंबई इंडियन्सने केरॉन पोलार्डला सोडले आहे. पोलार्ड आयपीएल 2010 पासून मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. त्याने संघाला ट्रॉफी जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. दरम्यान पोलार्ड आता निवृत्त झाल्यामुळे आता तो आयपीएलही खेळणार नाही असं समोर येत आहे. तसंच इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्सने ट्वीट करत तो आयपीएल 2023 मध्ये खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. बिलिंग्सच्या म्हणण्यानुसार, त्याला कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे, त्यामुळे तो आयपीएलच्या पुढील हंगामात खेळणार नाही.

आयपीएलचा 16 वा हंगाम अर्थात आयपीएल 2023 साठी आता काही महिने शिल्लक असून या हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोचीमध्ये मिनी लिलाव होणार आहे. बीसीसीआयने सर्व आयपीएल संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ( Retained Players ) ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितलं आहे. दरम्यान यंदा हा हंगाम पहिल्याप्रमाणे होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे. ज्यामुळे सर्व दहा संघ त्यांचे 7 सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा परदेशात किंवा ठरावीक शहरांत पार पडत होती.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूसCity 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 19 May 2024Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 08 PM : 19 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
Embed widget