
CSK vs RR: चेन्नई आणि राजस्थानमध्ये आज रंगणार सामना, प्लेइंग इलेव्हन ते खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Chennai vs Rajasthan: आयपीएल 2021 चा 12 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हन काय असू शकते जाणून घ्या.

Chennai vs Rajasthan: आयपीएल 2021 चा 12 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान होणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी विजय मिळविला आहे. अशा परिस्थितीत दोघांनाही विजयाची लय कायम ठेवण्याची इच्छा आहे. शेवटच्या सामन्यात चेन्नईने पंजाब किंग्जचा पराभव केला. त्याचवेळी राजस्थानने दिल्लीला पराभूत केले होते.
पंजाबविरुद्ध चांगली कामगिरी करणारा चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरवर आज सर्वांच्या नजरा असतील. राजस्थानला चहरचा सामना करावा लागेल. या सामन्यात चहर आणि राजस्थान यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. त्याचवेळी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नुकतीच चांगली कामगिरी केली होती. राजस्थानला चेन्नईविरुद्ध चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत त्यांचा गोलंदाजी विभाग थोडा कमकुवत आहे.
हेड-टू-हेड आकडेवारी
चेन्नई आणि राजस्थान यांच्यात हेड-टू-हेडमध्ये चेन्नई राजस्थानापेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 23 वेळा समोरासमोर आले आहेत, त्यापैकी चेन्नईने 14 वेळा विजय मिळवला आहे. त्याचवेळी राजस्थानला केवळ 9 सामने जिंकता आले आहेत. मात्र, आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्जवर वर्चस्व राखले होते.
लुंगी नगिदीचा संघात समावेश
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी नगिदी तंदुरुस्तीनंतर चेन्नई संघात दाखल झाला आहे. धोनीला विजयाची लय कामय राखायची आहे. अशा परिस्थितीत नगिदी आता बाहेर बसावे लागेल. त्याचवेळी राजस्थान त्याच टीमसह किंग्जशी सामना करण्याची शक्यता आहे.
खेळपट्टीचा अहवाल
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. दिल्ली आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात येथे फलंदाजी करणे सोपे गेले. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना आजच्या सामन्यात धावांचे डोंगर पहायला मिळण्याची शक्यता आहे. इथे दव मोठी भूमिका साकारणार आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन - रुतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सॅम कुर्रान, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन - जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, शिवम दुबे, रायन पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन सकरिया.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
