IPL 2022 : आगामी आयपीएल स्पर्धेला अजून बराच वेळ असला तरी यंदा 8 च्या जागी 10 संघ खेळणार असल्याने लिलाव प्रक्रियेपूर्वीच बरीच लगबग सुरु झाली आहे. आज म्हणजेच मंगळवारी (30 नोव्हेंबर) आयपीएल लिलावाआधी रिटेंशन प्रक्रिया अर्थात कोणता संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार? ही प्रक्रिया पार पडणार आहे. पण यापूर्वीच आयपीएलमधील दोन दिग्गज आणि महत्त्वाचे खेळाडू केएल राहुल (KL Rahul) आणि राशिद खान (Rashid Khan) हे संकटात अडकले आहेत. या दोघांवरही आगामी आयपीएलसाठी बंदी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


यामागील कारण म्हणजे या दोन्ही खेळाडूंविरुद्ध पंजाब आणि हैद्राबाद संघाने बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. कारण रिटेंशन प्रक्रियेपूर्वी केएल राहुल आणि राशिद खान यांचा आणि लखनौ आणि अहमदाबाद संघाचा एकमेंकाशी संपर्क झाल्यामुळे त्यांची बीसीसीआयकडे तक्रार करण्यात आली आहे. याबद्दल बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली. या अधिकाऱ्याच्या मते, ''नव्या दोन्ही संघाना लिलावाआधी तीन खेळाडू संघात घेण्याची मुभा आहे. मात्र ही प्रक्रिया रिटेंशन प्रक्रियेनंतरच पार पडू शकते. रिटेंशन पूर्वी या दोन्ही खेळाडू आणि नव्या संघात संपर्क झाल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार बीसीसीआयकडे आली आहे.  


पाहूयात रिटेंशनचे नियम काय आहेत –


प्रत्येक संघ चार खेळाडूंना रिटेन करु शकतो. यामध्ये दोनपेक्षा जास्त विदेशी खेळाडू नसतील असं बीसीसीआयने सांगितलेय. म्हणजे, 2 भारतीय 2 विदेशी अथवा तीन भारतीय एक विदेशी... अशा प्रकारे आपल्या संघातील खेळाडू रिटेन करण्याचे अधिकार आयपीएल संघाला देण्यात आले आहेत. 


रिटेंशन केलेल्या खेळाडूसाठी किती रक्कम?


बीसीसआयने यंदा प्रत्येक संघाला लिलिवात खेळाडू खरेदी करण्यासाठी 90 कोटी रुपये दिले आहेत. रिटेशनमध्ये खेळाडू खरेदी केल्यास यामधून रक्कम वजा होईल. पहिल्या रिटेशनसाठी 16 कोटी, दुसऱ्या रिटेशनसाठी 12 कोटी, तिसऱ्या रिटेशनसाठी 8 आणि चौथ्या रिटेशनसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. 


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha