IPL 2022 Retention Live Streaming : जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL). ही भव्य स्पर्धा जरी वर्षातले काही महिने चालत असली तरी या स्पर्धेची हवा मात्र वर्षभर असते. आतातर लिलाव प्रक्रियेपूर्वी कोणता संघ, कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार? अर्थात रिटेन करणार यासाठीही विशेष प्रक्रिया पार पडणार आहे. आज म्हणजेच मंगळवारी (30 नोव्हेंबर) ही प्रक्रिया पार पडणार असून तुम्ही देखील लाईव्ह टीव्हीवर ही प्रक्रिया पाहू शकता...


आगामी आयपीएलमध्ये 8 च्या जागी 10 संघ खेलणार आहेत. लखनौ आणि अहमदाबाद हे संघ नव्याने सामिल झाले असून त्यांच यंदाच पहिलं वर्ष असल्याने ते आजच्या रिटेन प्रक्रियेत सामिल होणार नाहीत. दरम्यान इतर 8 संघ नेमकं कोणत्या 4 खेळाडूंना रिटेन करणार? याकडे सर्वांच लक्ष आहे. तर या सर्व प्रक्रियेचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्हीही घरबसल्या पाहू शकता.. कसा? ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


कधी पार पडणार रिटेंशन प्रक्रिया?


आयपीएल 2022 साठीची रिटेंशन लिस्टची प्रक्रिया आज (30 नोव्हेंबर) रात्री 9:30 वाजल्यापासून सुरु होणार आहे.


कुठे पाहू शकता लाईव्ह टेलिकास्ट?


ही सर्व रिटेंशन प्रक्रिया स्टार स्पोर्ट्स 1 (Star Sports 1), स्टार स्पोर्ट्स 1 एचडी (Star Sports 1 HD), स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (Star Sports 1 Hindi), स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी (Star Sports 1 Hindi HD) याठिकाणी पाहू शकता.


लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहाल?


टेलिव्हिजनशिवाय इतर ठिकाणी ही प्रक्रिया पाहण्यासाठी डिजनी+हॉटस्टार (Disney+ Hotstar) या अॅपवर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.


पाहूयात रिटेंशनचे नियम काय आहेत –
प्रत्येक संघ चार खेळाडूंना रिटेन करु शकतो. यामध्ये दोनपेक्षा जास्त विदेशी खेळाडू नसतील असं बीसीसीआयने सांगितलेय. म्हणजे, 2 भारतीय 2 विदेशी अथवा तीन भारतीय एक विदेशी... अशा प्रकारे आपल्या संघातील खेळाडू रिटेन करण्याचे अधिकार आयपीएल संघाला देण्यात आले आहेत. 


रिटेंशन केलेल्या खेळाडूसाठी किती रक्कम?
बीसीसआयने यंदा प्रत्येक संघाला लिलिवात खेळाडू खरेदी करण्यासाठी 90 कोटी रुपये दिले आहेत. रिटेशनमध्ये खेळाडू खरेदी केल्यास यामधून रक्कम वजा होईल. पहिल्या रिटेशनसाठी 16 कोटी, दुसऱ्या रिटेशनसाठी 12 कोटी, तिसऱ्या रिटेशनसाठी 8 आणि चौथ्या रिटेशनसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. 



कोणता संघ कुणाला रिटेन करणार?


रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रसारमाध्यमांनी आपल्या सूत्रांच्या हवाल्यानं काही नावं प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार काही दिग्गज खेळाडूंना संघानी रिटेन केलेलं नाही. नियमाअभावी काही दिग्गजांना संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. पाहूयात कोणता संघ कोणत्या खेळाडूला रिटेन करु शकतो....


मुंबई इंडियन्स –
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, इशान किशन/सूर्यकुमार यादव


दिल्ली कॅपिट्लस –
ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, नॉर्खिया 


चेन्नई सुपरकिंग्ज – 
एम.एस. धोनी, ऋतुराज गायकवाड, रविंद्र जाडेजा, मोईन अली/सॅम करन


रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, यजुवेंद्र चहल, देवदत्त पडीकल/हर्षल पटेल


राजस्थान रॉयल –
संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, चेतन सकारिया


पंजाब किंग्ज – 
एकाही खेळाडूला रिटेन करणार नाही.


कोलकाता नाईट रायडर्स – 
रसेल, सुनिल नारायण, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर


सनरायजर्स हैदराबाद –
केन विल्यमसन, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, अब्दुल समद


लखनौ आणि अहमदाबाद संघ काय करणार?
लिलावात उतरलेल्या उर्वरित खेळाडूमधून लखनौ आणि अहमदाबाद संघाला तीन खेळाडू खरेदी करण्याची संधी. यामध्ये एक विदेशी आणि दोन भारतीय खेळाडू घ्यावे लागतील. यासाठी त्यांना 33 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं आहे. 


लिलावात असू शकतात हे खेळाडू
हार्दिक पांड्या, क्रृणाल पांड्या, बोल्ट, इशान किशन/सूर्यकुमार यादव, राहुल चहर, ख्रिस लीन, जेम्स निशम, डिकॉक, सुरेश रैना, ड्युप्लेसिस, मोईन अली/सॅम करन, ब्राव्हो, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जोश हेजलवूड, अंबाती रायडू, मिचेल सँटनर, श्रेयस अय्यर, रबाडा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, स्मिथ, हेटमायर, आवेश खान, स्टॉयनिस, देवदत्त पडीकल/हर्षल पटेल, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, हसरंगा, कायले जेमिसन, के. एल. राहुल, मार्करम, मयांक अग्रवाल, शाहरुख खान, मोहम्मद शामी, रवी बिश्नोई, दिपक हुड्डा, लिव्हिंगस्टोन, ख्रिस मॉरिस,डेव्हिड मिलर,तरबेज शम्सी, इविन लुईस, डेव्हिड वॉर्नर, मनिष पांडे, जॉनी बेयरस्टो, नटराजन, जेसन रॉय, जेसन होल्डर, मुजीब रहमान, मॉर्गन, दिनेश कार्तिक, नितेश राणा, राहुल त्रिपाठी, कमलेश नाटगरकोटे, कुलदीप यादव, लॉकी फर्गुसन, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, शुबमन गिल, शाकीब अल हसन. 


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha