IPL 2022 Auction: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या हंगामात म्हणजेच IPL 2022 मध्ये जुन्या आठ संघांना चार खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली जाईल. म्हणजे जुन्या आठ संघांना चार खेळाडू कायम ठेवता येतील. त्याचबरोबर उर्वरित खेळाडूंना लिलावात पाठवावे लागणार आहे. वास्तविक, लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ लिलावापूर्वी उर्वरित खेळाडूंच्या पूलमधून तीन खेळाडूंना निवडू शकतील, असे एका अहवालात म्हटले आहे. IPL 2022 च्या लिलावाची अधिकृत तारीख भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु वृत्तानुसार, लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे.
क्रिकेट वेबसाइट ESPNcricinfo नुसार, IPL अधिकाऱ्यांनी या आठवड्यात सर्व फ्रँचायझींसोबत अनौपचारिक संभाषणात हे नियम स्पष्ट केले. त्याचबरोबर यंदाच्या लिलावात कोणत्याही संघाला RTM (राईट टू मॅच) ची सुविधा मिळणार नाही. प्रथमच हा नियम हटवण्यात आला आहे.
IPL 2022 च्या लिलावासाठी पर्स 90 कोटी रुपये (अंदाजे 1.2 कोटी USD) असण्याची शक्यता आहे. 2021 च्या लिलावात हे 85 कोटी रुपये होते. त्याचवेळी, 2018 च्या मेगा लिलावात, संघांकडे 80 कोटी रुपये होते, त्यापैकी ते कायम ठेवलेल्या खेळाडूंवर जास्तीत जास्त 33 कोटी रुपये खर्च करू शकतात. संघांना रिटेन्शन आणि दोन राईट-टू-मॅच (RTM) कार्डच्या संयोजनाद्वारे पाच खेळाडूंपर्यंत परत खरेदी करण्याची परवानगी होती. मात्र, आता हा नियम रद्द करण्यात आला आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, पुढील वर्षी आरटीएम कार्ड नसेल. फ्रँचायझी त्यांना कायम ठेवू इच्छित असलेले चार खेळाडू निवडताना दोन भिन्न संयोजन लागू करू शकतील. तीन भारतीय आणि एक परदेशी, किंवा दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू असू शकतात.
आता दहा संघ..
क्रिकेटमध्ये टी-20 फॉरमॅट आल्यानंतर क्रिकेटचे रंगरूप बदलले आहे. यात आयपीएलने आणखी भर घातली आहे. आयपीएल गेल्या 14 वर्षात खूप गाजली असून क्रिकेट चाहत्यांनीही या लीगला भरभरून प्रेम दिले. क्रिकेटप्रेमींच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आयपीएलने देखील वेगवेगळ्या हंगामात नवनवीन बदल केले. दरम्यान, आयपीएलच्या पुढच्या हंगामात 8 नव्हेतर, 10 संघ खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. त्याप्रमाणे लखनौ आणि अहमदाबाद संघाचा समावेश करण्यात आला आहे.