India vs New Zealand, Mumbai Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका चांगलीच रंगली आहे. कारण पहिला सामना अगदी चुरशीत पार पडला जो अखेर अनिर्णीत सुटला. त्यामुळे सीरीजचा दुसरा आणि शेवटचा सामना जो 3 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे या सामन्यात भारताचा कायस्वरुपी कर्णधार विराट कोहली संघात परतणार असल्याने त्याच्यासाठी संघातून कोणाला बाहेर पडावे लागणार? हे पाहणेही महत्त्वाचे आहे. 


विराटच्या संघात येण्याने कोणत्या फलंदाजाला बाहेर पडावे लागेल? या प्रश्नाचे उत्तर दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या खराब फॉर्मवरुन समोर येत आहे. मागील बऱ्याच सामन्यांपासून दोघेही खास कामगिरी करु न शकल्याने दोघांपैकी एकाला बाहेर पडावे लागू शकते. दरम्यान अंजिक्य हा कर्णधार म्हणून संघात होता, पण आता विराट कर्णधार म्हणून आल्याने बहुदा रहाणेचं संघातील स्थान जाऊ शकतं. त्यात नव्याने संघात आलेला श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात शतक आणि अर्धशतक झळकावल्याने त्याचं संघातील स्थान जवळपास निश्चित झालं आहे.
   
रहाणे बाहेर गेल्यास फलंदाजीचा क्रम बदलणार


अजिंक्य रहाणे हा संघात एक महत्त्वाच्या स्थानी फलंदाजी करतो. पण तो खास कामगिरी करु न शकल्याने त्याचं संघातून बाहेर जाणं जवळपास निश्चित आहे. त्याच्या बाहेर पडल्यानंतर फलंदाजीचा क्रमही बदलेल. सलामीवीर म्हणून शुभमन गिल, मयांक अगरवाल. त्यानंतर
चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजा हे फलंदाजीला येतील. दरम्यान मयांकनेही खास कामगिरी न केल्याने तो संघाबाहेर जाऊ शकतो. पण त्याला एक आणखी संधी देण्याचे चान्सेसही अधिक आहेत.


असा असून शकतो अंतिम संघ - शुभमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.


हे ही वाचा-