(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK vs PBKS: पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव
CSK vs PBKS: मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या 11व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 54 धावांनी पराभव केला.
CSK vs PBKS: मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या 11व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 54 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग तिसरा पराभव आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 बाद 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जचा संघ 18 षटकांत सर्वबाद 126 धावांवर आटोपला. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्याचवेळी धोनीने देखील 23 धावा केल्या. पंजाबच्या या जबरदस्त विजयाचा हिरो होता लियाम लिव्हिंगस्टोन. इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने आजच्या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने पहिल्या फलंदाजीत केवळ 32 चेंडूत 60 धावांची स्फोटक खेळी खेळली. यानंतर त्याने गोलंदाजीतही दोन विकेट्स घेतल्या.
पदार्पणात जितेश शर्माची दमदार कामगिरी
पंजाब किंग्जचा यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्माने प्रथम फलंदाजी करताना दमदार कामगिरी केली. यष्टीरक्षण करताना त्याच्या एका निर्णयाने संघाचा विजय निश्चित झाला. जेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या बहुतेक विकेट पडल्या होत्या आणि महेंद्रसिंग धोनी मैदानात होता. तेव्हा 17.1 षटकात महेंद्रसिंग धोनीने राहुल चहरच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू थेट जितेश शर्माच्या हातात गेला. जितेश शर्माने झेल घेतला, पण पंचांनी त्याला नाबाद दिले. यानंतर जितेशने तत्काळ रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिले आणि कर्णधार मयंक अग्रवालनेही तसेच केले. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीही गोंधळलेला दिसत होता. पण तिसर्या पंचांनी रिप्ले पाहिल्यावर चेंडू एमएस धोनीच्या बॅटला लागल्याचे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत त्याला बाद घोषित करण्यात आले आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सर्व अशा मावळल्या.
संबंधित बातम्या: