एक्स्प्लोर

Virat Kohli IPL Stats: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट यंदा मात्र फ्लॉप, पाहा या मोसमात कोहलीची कामगिरी

आयपीएलमध्ये  सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली यंदाच्या मोसमात मात्र फ्लॉप ठरला आहे. या मोसमात विराट कोहलीला कोणत्याही सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

Virat Kohli IPL Stats : आत्तापर्यंत आयपीएलमध्ये  (Indian Premier League) सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा फलंदाज विराट कोहलीची ओळख आहे. मात्र, या मोसमात विराट कोहली आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. मंगळवारी लखनौविरुद्धच्या सामन्यात कोहलीला खातेही उघडता आले नाही. याआधीही त्याला या मोसमात कोणत्याही सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. एकेकाळी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा पाऊस पाडून सर्व विक्रम करणाऱ्या कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे.

या मोसमातील विराट कोहलीची कामगिरी 

विराट कोहलीने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 7 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 19.83 च्या सरासरीने केवळ 119 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 48 राहिली आहे. या मोसमात कोलहलीने आत्तापर्यंत 9 चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. गेल्या मोसमात विराट कोहलीची बॅट चांगली तळपली होती. त्याने मागील मोसमात 15 सामन्यात 405 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने 2010 पासून गेल्या मोसमापर्यंत विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली होती. दरम्यान त्याच्या फॉर्मची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

विराटची आत्तापर्यंतची आयपीएल कारकीर्द 

आयपीएलमध्ये 200 हून अधिक सामने खेळलेल्या फलंदाजांपैकी विराट कोहली हा एक आहे. कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 214 आयपीएल सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने सर्वोत्तम सरासरीने 6 हजार 402 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत 6000 हून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. कोहलीने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 5 शतके आणि 42 अर्धशतके झळकावली आहेत. विराटने 555 चौकार आणि 212 षटकारही मारले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक दावा करणारा फलंदाज कधी फॉर्ममध्ये येमार याची चाहते वाट बघत आहेत. 

विराट कोहलीसाठी आयपीएलचा हा पंधरावा हंगाम चांगला ठरला नाही. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी विराट कोहलीनं आरसीबीच्या संघाचं कर्णधार पद सोडलं आणि आता तो फलंदाजीमध्येही संघर्ष करताना दिसत आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामन्यात विराट कोहली शून्याबाद बाद झाला होता. या सामन्यात विराट कोहली गोल्डन डकचा शिकार ठरला. आयपीएलमध्ये चौथ्यांदा विराट कोहली खाते न उघडता माघारी परतला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget