DC vs PBKS, Head to Head : दिल्ली विरुद्ध पंजाबमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
IPL 2022 : आज पार पडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स सामन्यापूर्वी दोघांच्या एकमेंकाविरुद्धच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर एक नजर...
![DC vs PBKS, Head to Head : दिल्ली विरुद्ध पंजाबमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी In IPL 2022 Punjab Kings vs Delhi capitals know head to head statistics DC vs PBKS, Head to Head : दिल्ली विरुद्ध पंजाबमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/51ff64e8f133748d6e16983bb59c7dec_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
DC vs PBKS : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 31 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स (DC vs PBKS) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असणार आहेत. आजचा सामना आधी पुण्यातील एमसीए मैदानात पार पडणार होता. पण दिल्ली संघात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने संघाचा लांबचा प्रवास टाळण्यासाठी सामने मुंबईत घेण्याचा निर्णय़ घेण्यात आला. त्यामुळे सामना आता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.
दिल्ली विरुद्ध पंजाब Head to Head
आयपीएलमध्ये आजवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स तब्बल 28 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता पंजाबचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 13 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता हे दोन्ही संघ अनुक्रमे आठव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. दिल्लीने 5 पैकी 2 सामने जिंकले असून पंजाबने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. दिल्ली एका विजयाने पंजाबच्या मागे असली तरी रनरेटच्या बाबतीत दिल्लीचा संघ पुढे आहे.
आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
दिल्ली - ऋषभ पंत (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, अॅनरिक नोरखिया.
पंजाब - मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, संदीप शर्मा, राहुल चाहर
हे देखील वाचा-
- Yuzvendra Chahal : चहलच्या ज्या फोटोवर तयार झाले होते मीम्स, त्याच स्टाईलमध्ये केलं हॅट्रिकचं सेलिब्रेशन, पाहा Video
- Mitchell Marsh Covid Positive: दिल्लीचा ऑलराऊंडर मिशेल मार्श कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
- IPL 2022: देवदत्त पडिक्कल सुसाट! कोलकात्याविरुद्ध रचला विक्रम, रोहित शर्मालाही टाकलं मागं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)