(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सुपर-5' राजस्थानला मिळवून देणार फायनलचं तिकीट?
IPL 2022 : शुक्रवारी आरसीबीचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. राजस्थान रॉयल्सला पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
Rajasthan Royals Qualifier 2 : लखनौचा पराभव करत आरसीबीने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केलाय. शुक्रवारी आरसीबीचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. राजस्थान रॉयल्सला पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. आरसीबी आणि राजस्थान यांच्यातील विजेता संघ फायनलला गुजरातसोबत भिडणार आहे. आरसीबीला
फायनलच्या तिकीटासाठी राजस्थानच्या 'सुपर-5' ला रोखावं लागेल. या पाच खेळाडूंच्या हातात राजस्थानचं फायनलचं तिकीट आहे, असे म्हटल्यास वावगे वाटायला नको.. पाहूयात या खेळाडूबद्दल..
संजू सॅमसन -
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने यंदा विस्फोटक फलंदाजी केली आहे. संजूने 150 च्या स्ट्राईक रेटने 421 धावांचा पाऊस पाडलाय.
रविचंद्रन अश्विन -
आर अश्विनच्या अष्टपैलू खेळीचा राजस्थानने चांगलाच फायदा करुन घेतलाय. फलंदाजीसह गोलंदाजीतही अश्विनने चमकदार कामगिरी केली आहे. आरसीबीविरोधात साखळी सामन्यादरम्यान अश्विनने भेदक मारा केला होता. अश्विनने चार षटकात 17 धावांच्या मोबद्लयात तीन विकेट घेतल्या होत्या. आरसीबीला 145 धावाही करता आल्या नव्हत्या.
युजवेंद्र चहल -
मागील हंगामात युजवेंद्र चहल आरसीबीचा हिस्सा होता.. यंदा राजस्थानकडून चहल भेदक मारा करत आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट चहलच्या नावावर आहेत. चहलने 26 विकेट घेतल्या आहेत.
ट्रेंट बोल्ट -
आरसीबीचे सलामी फलंदाज राजस्थानच्या या वेगवान गोलंदाजाला सावध खेळू शकतात.. कारण पावरप्लेमध्ये बोल्ट चेंडू स्विंग करण्यात तरबेज आहे. अखेरच्या षटकात बोल्ट महागडा ठरला असला तरी सुरुवातीच्या षटकात आरसीबीला धक्के देऊ शकतो. विराट कोहली आणि फाफसाठी बोल्ट धोकादायक ठरु शकतो.
जोस बटलर -
जोस बटलर (Jos Buttler) आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. बटलरकडे सध्या ऑरेंज कॅप आहे... अन् त्याचा पाठलाग कुणीही करु शकणार नाही. पहिल्या क्वालिफायर सामन्यात बटलरने धावांचा पाऊस पाडला होता. तर आरसीबीविरोधात साखळी सामन्यात 70धावांची खेळी केली होती.