एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धोनी चेन्नईत परतणार, रैना आणि जाडेजाही सीएसकेमध्ये निश्चित!
चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांना २०१३ सालच्या स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणात दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.
नवी दिल्ली: आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघात पुनरागमनाचा मार्ग मोकळा केला आहे.
चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांना २०१३ सालच्या स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणात दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यामुळं गेल्या दोन वर्षांच्या काळात धोनीनं रायझिंग पुणेचं प्रतिनिधित्व केलं. पण चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचं आगामी आयपीएलमध्ये पुनरागमन होणार आहे.
धोनीही चेन्नईत परतणार
त्या वेळी धोनीचाही चेन्नई सुपर किंग्समध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय सुरेश रैना आणि रवींद्र जाडेजाही धोनीसोबत चेन्नईत परतणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
मुंबईने मला सर्व काही दिलं, मग मी का सोडू?: हार्दिक पंड्या
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या ठरावानुसार चेन्नई आणि राजस्थानला २०१५ सालच्या संघातल्या पाच खेळाडूंना कायम राखण्याची मुभा देण्यात आली आहे.
आगामी आयपीएलच्या लिलावाआधी आणि प्रत्यक्ष लिलावात मिळून पाच खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवण्याचा अधिकार चेन्नई आणि राजस्थानला मिळाला आहे.
महेंद्रसिंग धोनीची आजही असलेली ब्रॅण्ड व्हॅल्यू लक्षात घेता चेन्नई सुपर किंग्स पहिली पसंती त्याला कायम राखण्याला देईल, हे स्पष्ट आहे.
संबंधित बातम्या
मुंबईने मला सर्व काही दिलं, मग मी का सोडू?: हार्दिक पंड्या
IPL 2018 : चेन्नई परतणार, पण धोनी रैनाला सोडणार?
IPL 2018: धोनी तिघांना संघात ठेवणार, मग रैनाचं काय होणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement