एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बेन स्टोक्स पुण्याच्या ताफ्यात, बोली लावता लावता अंबानीही थकले!
बंगळुरु : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंतच्या बोलीमध्ये स्टोक्सला तब्बल 14.50 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावण्यात आली.
संजीव गोयंका यांच्या रायझिंग पुणे सुपरजाएंट्सने स्टोकसाठी एवढी मोठी रक्कम मोजली.
बेन स्टोक्सची बेस प्राईस 2 कोटी होती. सुरुवातीपासूनच स्टोक्सला आपल्याकडे घेण्यासाठी नीता अंबानींचा मुंबई इंडियन्स संघ उत्सुक होता. मात्र मुंबई इंडियन्स स्टोकला खरेदी करण्यात अपयशी ठरले.
स्टोक्ससाठी 2 कोटीवरुन सुरु झालेली बोली 4 कोटींवर, मग 6, 8, 10 कोटीपर्यंत पोहोचली. आतातरी ही बोली थांबेल असं सर्वांना वाटत होतं, मात्र ही बोली वाढतच गेली आणि सर्व फ्रँचांयझी स्टोकसाठी बोली लावत गेले.
अखेर 14.50 कोटी रुपयांना पुण्याच्या संघाने स्टोक्सला आपल्या ताफ्यात घेतलं. स्टोकच्या भावात तब्बल सव्वा सातपट वाढ झाली.
दरम्यान, या लिलावात न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील, अष्टपैलू इरफान पठाण, इंग्लंडचा जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स यासारखे खेळाडूंना कोणीही खरेदी केलं नाही.
तर राॅयल चॅलेंजर्स बंगलोरकडून पवन नेगीला 30 लाखांवरून एक कोटी रुपयांचा चढता भाव मिळाला.
दरम्यान, संघाचे मालक संजीव गोयंका यांनी स्टोक्स पुणे संघात दाखल झाल्यामुळे, आमची टीम परिपूर्ण झाली, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement