सुनील गावसकरांची भविष्यवाणी, देवदत्त पड्डिकलला लवकरच भारतीय संघात एन्ट्री मिळण्याची शक्यता
देवदत्त पडिक्कलने आयपीएलच्या मागील हंगामात देखील चांगली कामगिरी केली होती. पडिक्कलने विजय हजारे ट्रॉफी 2021 मध्ये सात सामन्यात 700 हून अधिक धावा केल्या.
IPL 2021 : देवदत्त पडिक्कलला राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सूर गवसला आहे. देवदत्तने आयपीएल स्पर्धेतील त्याचं पहिलं शतक झळकावलं. या सामन्यात देवदत्त पडिक्कलनं. देवदत्तनं 52 चेंडूत नाबात 101 धावा केल्या. त्याच्या या खेळीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला तसेच त्याल मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील देण्यात आला. माजी कर्णधार सुनील गावसकरांनी देखील पडिक्कलचे कौतुक केले आहे.
देवदत्त पडिक्कलने आयपीएलच्या मागील हंगामात देखील चांगली कामगिरी केली होती. पडिक्कलने विजय हजारे ट्रॉफी 2021 मध्ये सात सामन्यात 700 हून अधिक धावा केल्या. या टूर्नामेंटमध्ये त्याने सलग चार शानदार शतक झळकवले होते. गावसकर म्हणाले, लवकरच पडिक्कलला भारतीय संघात खेळताना पाहून आश्चर्य वाटणार नाही.
एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना गावसकर म्हणाले, भविष्यात पडिक्कलला भारतीय संघासाठी खेळताना पाहून मला आश्चर्य वाटणार नाही. कारण त्याच्यामध्ये भारतीय संघासाठी खेळण्याची पात्रता आहे. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये देखील चांगल्या धावा केल्या आहेत. रणजीमध्ये शतक झळकवले आहे.
माजी भारतीय क्रिकेटर गावसकर पुढे म्हणाले, कर्नाटकने आजपर्यंत भारतीय क्रिकेट संघाला अनेक चांगले फलंदाज दिले आहे. राहुल द्रविड, गुंडप्पा विश्वनाथ आणि केएल राहुल.
20 वर्षीय देवदत्त पडिक्कलने आयपीएलच्या मागील हंगामात 493 धावा केल्या होत्या. या आयपीएल हंगामात स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर करोनावर यशस्वीरित्या मात करत देवदत्त संघात परतला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला आराम देण्यात आला होता