RCB vs SRH : हैदराबादचा बंगळुरूवर चार धावांनी विजय
RCB vs SRH: इंडियन प्रीमियर लीग सीझन 14च्या 52 व्या सामन्यात हैदराबादने बंगळूरुचा चार धावांनी पराभव केला आहे
RCB vs SRH: इंडियन प्रीमियर लीग सीझन 14च्या 52 व्या सामन्यात हैदराबादने बंगळूरुचा चार धावांनी पराभव केला आहे. हैदराबादने बंगळूरुसमोर 142 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बंगळूरूने हे आव्हान पूर्ण करता आले नाही. बंगळूरूने ने सहा गडी गमावत 137 धावा केल्या.
बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने 20 षटकात 142 धावांचे आव्हान दिले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर, सिद्धार्थ कौल, उमरान मलिक आणि राशिद खान यांनी प्रत्येक एक विकेट घेतले. अभिषेक शर्माच्या रुपाने हैदराबादला पहिला धक्का बसला. १३ धावा करून अभिषेक शर्मा तंबूत परतला. जेसन रॉय आणि केन विल्यमसनने दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. केन विल्यमसनने 29 चेंडूत 31 धावांची खेळी केली. प्रियम गर्ग(15) धावा वृद्धिमान ( 16) धावा करून बाद झाला. बंगळुरूकडून हर्षल पटेलनं 3 तर डॅन ख्रिश्चियनने 2, जॉर्ज गार्टन आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक गडी बाद केला. हैदराबादचा या हंगामातील हा तिसरा विजय आहे.
बंगळुरूची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार विराट कोहली पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला. फक्त 5 धावा करून विराट तंबूत परतला. त्यानंतर डॅन ख्रिश्चियनही कमाल करू शकला नाही. श्रीकर भारतही 12 धावा करू बाद झाला. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी देवदत्त पडिक्कल आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी चांगली भागिदारी केली. देवदत्त पडिक्कलवने 52 बॉलमध्ये 41 धावा केल्या.
बंगळुरू - विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीकल, श्रीकर भारत (विकेटकिपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डेन ख्रिश्चन, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.
हैदराबाद - जेसन रॉय, रिद्धिमान साहा (विकेटकिपर), केन विल्यमसन (कर्णधार), प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, उम्रान मलिक.