(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 13 : 437 दिवसांनतर मैदानात उतरलेल्या धोनीची कमाल, IPL मध्ये केले हे विक्रम
IPL 2020 MI vs CSK: चेन्नईनं विजयी सलामी दिलेल्या या सामन्यात सर्वाचं लक्ष होतं ते महेंद्रसिंह धोनीवर. 437 दिवसांनंतर मैदानात उतरलेल्या धोनीला या सामन्यात एकही धाव घेता आली नाही. मात्र तरीही त्याने काही विक्रम मात्र आपल्या नावे केले.
IPL 2020 MI vs CSK: गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या तेराव्या सीजनची विजयी सुरुवात केली आहे. चेन्नईने मुंबईवर पाच विकेट्ने मात केली. चेन्नईच्या विजयात अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिसने महत्त्वाची कामगिरी बजावली.
चेन्नईनं विजयी सलामी दिलेल्या या सामन्यात सर्वाचं लक्ष होतं ते महेंद्रसिंह धोनीवर. 437 दिवसांनंतर मैदानात उतरलेल्या धोनीला या सामन्यात एकही धाव घेता आली नाही. मात्र तरीही त्याने काही विक्रम मात्र आपल्या नावे केले. धोनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सला 100 सामने जिंकून देणारा कर्णधार ठरलाय.
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात धोनी एकमेव असा कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वात संघानं 100 सामने जिंकले आहेत. धोनीनं 161 सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व केलं, त्यापैकी 100 सामन्यात विजय मिळाला आहे तर 60 सामने गमावले आहेत. सीएसकेचा कर्णधार म्हणून धोनीचा विनिंग परसेंट 60 हून अधिक आहे. यात देखील धोनी अव्वल आहे.
100 कॅच घेण्याचा पराक्रम
महेंद्र सिंह धोनीनं 13व्या हंगामातील पहिल्या सामन्यात आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केलं. धोनी आयपीएलमध्ये 100 कॅच घेणारा खेळाडू ठरला आहे. कालच्या सामन्यात धोनीनं दोन कॅच पकडले. धोनीने 100 पैकी 95 कॅच विकेटकीपर म्हणून पकडले आहेत. तर धोनी टी-20 क्रिकेट मध्ये 250 वर खेळाडूंना यष्टिमागे बाद करणारा विकेटकिपर देखील ठरला आहे.
IPL 2020 : मुंबईची परंपरा कायम, गेल्या आठ सिझनमध्ये सलामीच्या सामन्यात पराभव
गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या तेराव्या सीजनची विजयी सुरुवात केली. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत यूएई मध्ये सहा सामने खेळले आहेत. या सहाही सामन्यात मुंबई इंडियन्सला हार पत्करावी लागली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या तुलनेत चेन्नईच्या संघाला यूएईमध्ये चांगले यश मिळाले आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत यूएई मध्ये खेळळ्या गेलेल्या सहा सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसके संघाने आपला रेकॉर्डला कायम ठेवला आहे.
IPL 2020 MI vs CSK: गतविजेत्या मुंबईचा पराभव करत चेन्नईची विजयी सलामी
यूएईमध्ये मुंबई-चेन्नईचा पूर्वीही सामना यूएई मधील दुबईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये 2014 ला सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 7 गडी गमावून 141 धावा काढल्या होत्या. बदल्यात चेन्नईच्या टीमने 19 ओवरमध्ये तीन गडी गमावून सामना आपल्या खिशात घातला होता. कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्ससमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईच्या प्रभावी माऱ्यासमोर मुंबईला 9 बाद 162 धावांचीच मजल मारता आली होती. हे लक्ष्य अंबाती रायुडूच्या 71 तर फाफ डू प्लेसिसच्या 58 धावांमुळं चेन्नईनं चार चेंडू आणि पाच विकेट्स राखून पार केलं.