IPL 2020, KXIPvsSRH | विजयाच्या शोधात असलेले पंजाब-हैदराबाद आमने-सामने
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फलंदाजांची कामगिरी चांगली झाली आहे, पण गोलंदाजीमुळे संघ अडचणीत आहे. तर सामना जिंकण्यासाठी हैदराबादला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
IPL 2020, KXIPvsSRH | आयपीएलमध्ये गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबादचे संघ आमनेसामने असतील. दोन्ही संघांची यंदाच्या मोसमातील कामगिरी खराब असून दोन्ही संघ आज विजयाच्या शोधात असतील. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फलंदाजांची कामगिरी चांगली झाली आहे, पण गोलंदाजीमुळे संघ अडचणीत आहे. तर सामना जिंकण्यासाठी हैदराबादला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल.
किंग्ज इलेव्हन पॉईंट टेबलच्या तळाशी
यंदाच्या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबची कामगिरी आतापर्यंत अतिशय खराब आहे. सलामीवीर केएल राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये असूनही पंजाबने आतापर्यंत 5 सामन्यांत फक्त एक सामना जिंकला आहे, तर 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबची गोलंदाजी त्यांची सर्वात कमजोर बाजू आहे. पंजाबच्या गोलंदाजांनी आतापर्यंत निराश केलं आहे. दुसरीकडे फलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
सनरायझर्स हैदराबादची निराशाजनक कामगिरी
सनरायझर्स हैदराबादबद्दल जर बोलायचे झाले तर यंदाच मोसम आतापर्यंत त्यांच्यासाठी खूप वाईट होता. हैदराबादने आतापर्यंत पाच सामने खेळले असून यामध्ये त्यांना 2 विजय मिळवत आले आहेत. तर 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादला मागील दोन सामन्यात हार पत्करावी लागली आहे. जर हैदराबादला किंग्जविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर विरोधी संघाच्या सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडणे गरजेचं आहे.
केएल राहुल आणि मयंक अग्रवालला रोखणे हैदराबाद समोरील आव्हान
पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. राहुलने 5 सामन्यात 75 च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत, तर मयंकने 5 सामन्यात 54 च्या सरासरीने 272 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा केएल राहुलच्या नावे आहेत. तर या यादीत मयांक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पंजाबची ही जोडी फोडणे हैदराबादसमोरील आव्हान असणार आहे.