(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020 | किंग्ज इलेव्हन पंजाब सर्वाधिक कर्णधार बदलणारा संघ, केएल राहुल बारावा कर्णधार
किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कर्णधार बदलणारा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज बेलीने सर्वाधिक 35 सामने पंजाबचं नेतृत्व केलं आहे.
IPL 2020 DCvsKXIP : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रातील दुसर्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणार्या या सामन्यात पंजाबसमोर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान आहे. या सीजनमध्ये केएल राहुलकडे पंजाबची धुरा आहे. केएल राहुल पंजाबचा 12 कर्णधार ठरला आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कर्णधार बदलणारा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज बेलीने सर्वाधिक 35 सामने पंजाबचं नेतृत्व केलं आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबचे आजवरचे कर्णधार
- युवराज सिंग- 29 सामने (2008-2009)
- कुमार संघकारा- 13 सामने (2010)
- महेला जयवर्धने- 1 सामना (2010)
- अॅडम गिलख्रिस्ट- 34 सामने (2011-2013)
- डेविड हसी- 12 सामने (2012-1013)
- जॉर्ज बेली- 35 सामने (2014-2015)
- वीरेंद्र सेहवाग- 1 सामना (2015)
- डेविड मिलर- 6 सामने (2016)
- मुरली विजय- 8 सामने (2016)
- ग्लेन मॅक्सवेल- 14 सामने (2017)
- आर अश्विन- 28 सामने (2018-2019)
- केएल राहुल- (2020)
या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 11 कर्णधार बदलले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही संघ अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकले नाहीत. अशा प्रकारे या दोन्ही सघांना स्पर्धेची विजयी सुरुवात करायला आवडेल. आजच्या सामन्यात रवी बिश्नोईला पंजाबकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नाही.
संबंधित बातम्या