एक्स्प्लोर
IPL 2020, DCvsKXIP : धवनच्या शतकानंतरही दिल्लीच्या पदरी पराभव; किंग्स इलेव्हन पंजाब 5 विकेट्सनी विजयी
दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवननं आयपीएलच्या मैदानात आज इतिहास रचला. धवननं पंजाबविरुद्धच्या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 106 धावांची खेळी उभारली.
IPL 2020, DCvsKXIP : किंग्स इलेव्हन पंजाबनं दिल्ली कॅपिटल्सचा पाच विकेट्सनी पराभव करुन स्पर्धेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. दिल्लीनं दिलेलं 165 धावांचं आव्हान पंजाबनं 19 व्या षटकातच पार केलं. पंजाबकडून निकोलस पूरननं 53 तर ग्लेन मॅक्सवेलनं 32 धावांची खेळी केली. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 63 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. पंजाबचा यंदाच्या मोसमातला हा चौथा विजय ठरला.
धवनचं शतक, इतर फलंदाजांची हाराकिरी
त्याआधी शिखर धवनच्या शतकी खेळीनंतरही दिल्लीला 20 षटकात 5 बाद 164 धावांचीच मजल मारता आली. धवनचा अपवाद वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी उभारता आली नाही. धवननं नाबाद 106 धावांची खेळी केली. पण त्याखालोखाल श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतची प्रत्येकी 14 धावांची खेळीच सर्वोच्च ठरली. पंजाबकडून मोहम्मद शमीनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
शिखर धवनचं विक्रमी शतक
दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवननं आयपीएलच्या मैदानात आज इतिहास रचला. धवननं पंजाबविरुद्धच्या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 106 धावांची खेळी उभारली. धवनचं हे यंदाच्या मोसमातलं सलग दुसरं शतक ठरलं. याआधीच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही त्यानं नाबाद 101 धावांची खेळी केली होती. त्यामुळे आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात सलग दोन शतकं ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. दरम्यान धवननं याच सामन्यात आय़पीएलमध्य़े पाच हजार धावांचा टप्पाही ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो आजवरचा पाचवा फलंदाज ठरला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement