एक्स्प्लोर
Advertisement
IPL ची तारीख ठरली! सप्टेंबरमध्ये सुरु होऊ शकते आयपीएल, नोव्हेंबरमध्ये फायनल?
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) च्या तेराव्या सिझनची वाट पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी. यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरु होऊ शकते.
नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) च्या तेराव्या सिझनची वाट पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी. यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमीरातमध्ये सुरु होऊ शकते. तर आयपीएलची फायनल आठ नोव्हेंबरला होऊ शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनी गुरुवारी पीटीआयला ही माहिती दिली आहे.
आयपीएल व्यवस्थापन परिषदेची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे, या बैठकीत आयपीएलबाबत अंतिम रुपरेषा ठरणार आहे. माहिती अशीही मिळाली आहे की, बीसीसीआयने आपल्या निर्णयाबाबत फ्रेंचायजींना देखील माहिती दिली आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, पूर्ण शक्यता आहे की, आयपीएल 19 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 8 नोव्हेंबरला फायनल खेळवली जाईल. यानुसार आयपीएल 13 सिझनचं हे आयोजन 51 दिवसांचं असेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी20 विश्वचषक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आयपीएलचं आयोजन होण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलचा हा 13 हंगाम 26 सप्टेंबरपासून सुरु होईल असं सांगितलं जात होतं, मात्र आता एक आठवडा आधीच सुरु होऊ शकतं, कारण त्यानंतर टीम इंडियाचा आस्ट्रेलिया दौरा होणार आहे. अधिकाऱ्यानं सांगितलं की, भारतीय संघाला आस्ट्रेलिया सरकारच्या नियमानुसार त्या दौऱ्यात 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे.
कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप यावर्षी होणार नाही, आयपीएलचा मार्ग मोकळा
कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (ICC) यावर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-20 वर्ल्ड कप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आयसीसीच्या बोर्ड मीटिंगमध्ये वर्ल्ड कप टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्ल्ड कप पुढे ढकलल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीजनचा रस्ता मोकळा झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वर्ल्ड कपचं आयोजन यावर्षी होणार नाही, असे अंदाज बांधले जात होते. वर्ल्ड कपचं आयोजन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वीच यावर्षी वर्ल्ड कपसाठी तयार नसल्याचं म्हटलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियात कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. यामुळे सप्टेंबरच्या शेवटापर्यंत ऑस्ट्रेलियाने आपल्या सीमाही सील केल्या आहेत.
IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या सीजनचं दुबईत होणार आयोजन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
मुंबई
Advertisement