एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2019 : पंजाबचा शेवट गोड, पराभवानंतरही चेन्नईचं अव्वल स्थान कायम
या पराभवानंतरही चेन्नईचं अव्वल स्थान कायम आहे. मात्र हा स्थान मुंबई इंडियन्सच्या निकालावर अवलंबून आहे. असे असले तरी त्यांनी क्वालिफायर 1 मधील स्थान पक्के केले आहे.
मोहाली : किंग्स इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्सवर सहा विकेट्सनी मात करत आयपीएल 2019 चा आपला शेवट गोड केला. लोकेश राहुल ( 71) आणि ख्रिस गेल (28) यांच्या 108 धावांच्या सलामीने किंग्स इलेव्हन पंजाबचा विजय पक्का केला होता. मात्र, शेवटी हरभजन सिंगने पंजाबला लागोपाठ तीन धक्के देत सामन्यात चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला
मात्र अखेर पंजाबने चेन्नईचे 171 धावांचे लक्ष्य 18 व्या षटकातच सहज पार केले. राहुल ( 71) आणि ख्रिस गेलशिवाय निकोलस पुरणने 21 चेंडूंत 36 धावा केल्या. या पराभवानंतरही चेन्नईचं अव्वल स्थान कायम आहे. मात्र हा स्थान मुंबई इंडियन्सच्या निकालावर अवलंबून आहे. असे असले तरी त्यांनी क्वालिफायर 1 मधील स्थान पक्के केले आहे.
तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएलमधल्या अखेरच्या साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईच्या फाफ ड्यू प्लेसीचं शतक अवघ्या चार धावांनी हुकलं. त्यानं 55 चेंडूत 10 चौकार आणि चार षटकारांसह 96 धावांची खेळी केली.
तर डावखुऱ्या सुरेश रैनानं 38 चेंडूत 53 धावा फटकावून त्याला छान साथ दिली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे चेन्नईला 20 षटकांत पाच बाद 170 धावांची मजल मारता आली. पंजाबच्या कुरनने तीन, तर मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement