एक्स्प्लोर

IPL 2019 FINAL : आयपीएलचा अंतिम सामन्याचा आज रोमांच, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स चौथ्यांदा आमनेसामने

या लढतीच्या निमित्तानं आयपीएलचा सर्वोत्तम कर्णधार कोण याचंही उत्तर आपल्याला मिळेल. कारण या सामन्याच्या निमित्तानं सर्वाधिक तीन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणारे कर्णधार आमनेसामने येणार आहेत.

हैदराबाद : हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर आज आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएलच्या बाराव्या मोसमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता प्रत्येक क्रिकेटरसिकाला लागून राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघात आज रात्री आयपीएलची अंतिम लढत रंगणार आहे. या लढतीच्या निमित्तानं आयपीएलचा सर्वोत्तम कर्णधार कोण याचंही उत्तर आपल्याला मिळेल. कारण या सामन्याच्या निमित्तानं सर्वाधिक तीन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणारे कर्णधार आमनेसामने येणार आहेत. मुंबई आणि चेन्नई आयपीएल इतिहासात चौथ्यांदा आमनेसामने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आयपीएल इतिहासात चौथ्यांदा आमनेसामने येणार आहेत. मुंबई आणि चेन्नई संघांमध्ये याआधी 2010, 2013 आणि 2015 साली फायनल झाली आहे. त्यात 2010 साली चेन्नईनं तर मुंबईनं 2013 आणि 2015 साली आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.
IPL Final | आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई-चेन्नई भिडतात, तेव्हा काय होतं?
आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी प्रत्येकी तीनवेळा विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्यामुळं रिआल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना फुटबॉल सामन्याच्या धर्तीवर मुंबई आणि चेन्नई संघांमधला आयपीएल सामना हा 'अल क्लासिको' म्हणून ओळखला जातो. आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? धोनी की शर्मा हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना रं दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये अर्थात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई  इंडियन्सदरम्यान रंगणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मानं आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवला आहे. आयपीएलच्या इतिहासात धोनी आणि रोहितनं प्रत्येकी तीन वेळा आपापल्या संघांना विजेतेपद मिळवून दिलं आहे. त्यामुळे सर्वाधिक विजेतीपदं मिळवणारा कर्णधार कोण ठरणार याची क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता आहे. 2010  साली धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं पहिल्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर 2011 आणि 2018 साली चेन्नईनं आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. चेन्नईचा आयपीएलमधल्या यशाचा आलेख पाहता या संघानं नऊपैकी सातवेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सला 2013 साली आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवून दिलं. तेही तब्बल सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर. त्यानंतर 2015 आणि 2017 साली मुंबईच्या संघानं रोहितच्याच नेतृत्वात त्याची पुनरावृत्ती केली. मुंबईनं गेल्या अकरा मोसमात चार वेळा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. मुंबई ठरली आहे वरचढ मुंबई आणि चेन्नई या दोन तुल्यबळ संघांमध्ये आजवर 29 लढती खेळवण्यात आल्या आहेत. त्यात धोनीच्या चेन्नईनं 12 तर रोहितच्या मुंबईनं 17 सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यांतही तीनपैकी दोन वेळा मुंबईच किंग ठरली आहे. तर यंदाच्या आयपीएलमध्येही साखळी आणि क्वालिफायर अशा तिन्ही सामन्यात मुंबईनं चेन्नईला पाणी पाजलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार अशी महेंद्रसिंग धोनीची ख्याती आहे. पण आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध आतापर्यंतचा प्रवास पाहता या सर्वोत्तम कर्णधाराला अंतिम सामन्याच्या निमित्तानं खास रणनीतीची आखण्याची गरज आहे. अन्यथा रोहित शर्मा हा आयपीएलचा सर्वोत्तम कर्णधार ठरला तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही.
IPL Final | आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई-चेन्नई भिडतात, तेव्हा काय होतं?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..

व्हिडीओ

Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 15 DEC 2025 : ABP Majha
Maharashtra Election Commission PC : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, ४ वाजता पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Embed widget