एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2019 : चेन्नईची कोलकात्यावर 7 विकेट्सनी मात
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किग्सने आजच्या सामन्यात कोलकाकाता नाईट रायडर्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून यंदाच्या आयपीएलमधला पाचवा विजय साजरा केला.
चेन्नई : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किग्सने आजच्या सामन्यात कोलकाकाता नाईट रायडर्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून यंदाच्या आयपीएलमधला पाचवा विजय साजरा केला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेतही पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. या सामन्यात कोलकात्याने चेन्नईसमोर 109 धावांचे सोपे आव्हान ठेवले होते. चेन्नईने हे आव्हान सात विकेट्स आणि 16 चेंडू राखून पार केले. चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसीसने नाबाद 43 धावांची खेळी साकारली. प्लेसीसनेच चेन्नईला विजय मिळवून दिला.
कोलकात्याने दिलेले 109 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेलल्या चेन्नईच्या संघाने सावधपणे सुरुवात केली. चेन्नईचा सलामीवीर शेट वॅट्सन (17 धावा) लवकर माघारी परतला. त्यानंतर प्लेसीस आणि अंबाती रायुडूने (21 धावा)चेन्नईला विजयाच्या समीप नेले. अखेर चेन्नईने कोलात्याचे आव्हान 17.2 षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
तत्पूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या प्रभावी माऱ्यासमोर कोलकाता नाईट रायडर्सची सहा बाद 47 अशी दाणादाण उडाली होती. पण आंद्रे रसेल पुन्हा एकदा कोलकात्याच्या मदतीला धावून आला. रसेलने एका बाजूने कोलकात्याची खिंड लढवताना 44 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 50 धावांची खेळी केली. त्यामुळे कोलकात्याला 20 षटकांत 9 बाद 108 धावांची मजल मारता आली. चेन्नईकडून दीपक चहरने तीन तर इम्रान ताहीर आणि हरभजन सिंहने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement