एक्स्प्लोर
Advertisement
IPL 2018 : चेन्नई सुपरकिंग्सचा मुंबई इंडियन्सवर एका विकेटने विजय
आयपीएलच्या अकराव्या मोसमातील पहिल्या सामन्यात 'चेन्नई सुपर किंग्स'ने 'मुंबई इंडियन्स'चा एका विकेटने सनसनाटी पराभव केला
मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या 'चेन्नई सुपर किंग्स'ने 'मुंबई इंडियन्स'चा एका विकेटने सनसनाटी पराभव करुन आयपीएलच्या रणांगणात आपलं पुनरागमन साजरं केलं.
वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात मुंबईने चेन्नईला विजयासाठी 20 षटकांत 166 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची आठ बाद 118 अशी घसरगुंडी उडाली होती. त्या परिस्थितीत ड्वेन ब्राव्होनं 30 चेंडूंमध्ये 68 धावांची खेळी उभारुन चेन्नईला विजयपथावर नेलं.
ब्राव्होने तीन चौकार आणि सात षटकार लगावत ही खेळी साकारली. ब्राव्हो बाद झाला, त्यावेळी चेन्नईला विजयासाठी सहा चेंडूंमध्ये सात धावांची आवश्यकता होती. केदार जाधवने एक चेंडू राखून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
त्याआधी, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंड्याच्या आतषबाजीनं मुंबईला वीस षटकांत चार बाद 165 धावांची मजल मारुन दिली होती.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 'रन'संग्रामाची ठिणगी पडली आणि आयपीएलच्या नव्या मोसमाचा शुभारंभ झाला.
विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दोन वेळा आयपीएल जिंकणारी कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या दिवशी एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत.
या दोन्ही फौजा आयपीएलच्या नव्या मोसमातल्या आपल्या सलामीच्या लढाईसाठी सज्ज झाल्या आहेत. दोन संघांमधला हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement