एक्स्प्लोर
तुझं लग्न आहे, कसं वाटतंय?, धवनच्या प्रश्नाला भुवीचं हटके उत्तर
ग्रेटर नोएडमधील नुपुर नगरमध्ये 4 नोव्हेंबर रोजी भुवीचा साखरपुडा पार पडला. आता 23 नोव्हेंबरला भुवी विवाहबंधनात अडकणार आहे.
![तुझं लग्न आहे, कसं वाटतंय?, धवनच्या प्रश्नाला भुवीचं हटके उत्तर Interesting questions to Bhuvneshwar Kumar about marriage by Shikhar Dhawan latest updates तुझं लग्न आहे, कसं वाटतंय?, धवनच्या प्रश्नाला भुवीचं हटके उत्तर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/21043116/dhavan-and-bhuvi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : श्रीलंकेविरोधात दणदणीत कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आता नव्या इनिंगसाठी तयार झाला आहे. येत्या 23 नोव्हेंबरला भुवनेश्वर कुमार विवाहबंधनात अडकणार आहे. त्यावरुन शिखर धवनने भुवनेश्वर कुमारची फिरकी घेतली.
शिखर धवनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात धवन आणि भुवनेश्वरचा संवाद आहे. त्यामध्ये धवनने भुवीला त्याच्या लग्नाबाबत काही प्रश्न विचारले आहेत.
धवनचा प्रश्न
धवनने भुवीला विचारलं, “बघा, आमचा आणखी एक वाघ आता ‘जोरु का गुलाम’ बनणार आहे. मोतीचूर का लड्डू जो खाए वो भी पछताए जो ना खाए वो भी पछताए. त्यामुळे भुवी, आता कसं वाटतंय आणि लग्नाची काय तयारी सुरु आहे?”
भुवीचं उत्तर
धवनच्या या प्रश्नाला उत्तर देताना भुवी म्हणाला, “लग्न उद्या नाही, 23 नोव्हेंबरला आहे आणि तयारी अशी काही खास नाही. जी तयारी करायचीय, ती सारी घरची माणसं करत आहेत. आता मॅच खेळून थकलोय. त्यामुळे माहित नाही, घरी जाऊन काय फिलिंग असतील.”. मात्र यावेळी भुवीने धवनकडे इशारा करत म्हटले, “तुम्हा लोकांकडून कळलंय की, लग्नानंरची फिलिंग चांगली असते.”
पाहा व्हिडीओ :
23 तारखेला लग्न ग्रेटर नोएडमधील नुपुर नगरमध्ये 4 नोव्हेंबर रोजी भुवीचा साखरपुडा पार पडला. आता 23 नोव्हेंबरला भुवी विवाहबंधनात अडकणार आहे. श्रीलंकेविरोधातील उर्वरित 2 सामन्यांना भुवी मुकणार भुवनेश्वरला श्रीलंकेविरोधातील उर्वरित दोन कसोटी सामन्यांना मुकावं लागणार आहे. तामिळनाडूचा ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकरला भुवनेश्वर कुमारच्या जागी संधी देण्यात आली. भारतीय अ संघ आणि तामिळनाडूकडून खेळताना विजय शंकरने दमदार प्रदर्शन केलं आहे. पहिल्या कसोटीत सामनावीर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वरने महत्त्त्वाची भूमिका निभावली. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दोन्ही डावात मिळून त्याने आठ विकेट घेतल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)