एक्स्प्लोर

धोनीचा नवा विक्रम, अर्धशतकांचं शतक पूर्ण!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अर्धशतकांचं शतक झळकावणारा धोनी हा भारताचा चौथा आणि जगभरातला तेरावा फलंदाज ठरला.

चेन्नई: भारताच्या महेंद्रसिंग धोनीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डेत अर्धशतक झळकावून, आजवरच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अर्धशतकांचं शतक साजरं केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अर्धशतकांचं शतक झळकावणारा धोनी हा भारताचा चौथा आणि जगभरातला तेरावा फलंदाज ठरला. धोनीच्या नावावर कसोटीत 33, वन डेत 66 आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत एक अशी मिळून 100 आंतरराष्ट्रीय अर्धशतकं आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सचिन तेंडुलकरनं सर्वाधिक 164, राहुल द्रविडनं 146 आणि सौरव गांगुलीनं 107 अर्धशतकं फटकावली आहेत. धोनी आता त्या तिघांच्या पंक्तीत येऊन दाखल झाला आहे. भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय विराट कोहलीच्या टीम इंडियानं चेन्नईच्या पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा 26 धावांनी धुव्वा उडवून, पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 षटकांत 282 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पावसाच्या व्यत्ययामुळं ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस पद्धतीनुसार 21 षटकांत 164 धावांचं सुधारित लक्ष्य देण्यात आलं होतं. पण ग्लेन मॅक्सवेलचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर सपशेल नांगी टाकली. भारतानं ऑस्ट्रेलियाला 21 षटकांत नऊ बाद 137 धावांत रोखलं. भारताकडून यजुवेंद्र चहलनं तीन, कुलदीप यादवनं दोन, हार्दिक पंड्यानं दोन आणि जसप्रीत बुमरानं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तत्पूर्वी महेंद्रसिंग धोनीनं आधी हार्दिक पांड्या आणि मग भुवनेश्वर कुमारच्या साथीनं रचलेल्या भागिदाऱ्यांनी भारताला 50 षटकांत सात बाद 281 धावांची मजल मारुन दिली. त्याआधी, या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ 87 धावांतच माघारी धाडला होता. पण पांड्या आणि धोनीनं रचलेल्या 118 धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला स्थैर्य दिलं. पांड्यानं 66 चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 83 धावांची खेळी उभारली. धोनीनं 88 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह 79 धावांची खेळी केली. धोनीनं भुवनेश्वर कुमारच्या साथीनं 72 धावांची भागीदारी रचली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Embed widget