(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indonesia Masters 2022: इंडोनेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेनचा पराभव
Indonesia Masters 2022: जागतिक चॅम्पियनशिपच्या कांस्यपदक विजेता लक्ष्य सेनला चाऊ तिएन चेननं 21-16, 12-21, 21-14 पराभूत केलंय.
Indonesia Masters 2022: इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेतून उपांत्यपूर्व फेरीत भारताचा युवा शटलर लक्ष्य सेनला (Lakshya Sen) चिनी तैपेईच्या चाऊ तिएन चेनकडून (Chou Tien-chen) पराभव स्वीकारावा लागलाय. जागतिक चॅम्पियनशिपच्या कांस्यपदक विजेता लक्ष्य सेनला चाऊ तिएन चेननं 21-16, 12-21, 21-14 अशा फरकानं पराभूत केलंय. थॉमस चषकानंतर लक्ष्य सेनची ही दुसरी स्पर्धा होती. त्यानं थायलँड ओपनमधून ब्रेक घेतला होता.
या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये लक्ष्य सेनला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये चाऊ तिएन चेनला पराभूत करून लक्ष्य सेननं जोरदार कमबॅक केलं. मात्र, अखेरच्या आणि निर्णायक सेटमध्ये लक्ष्य सेनचा पराभव झाला. निर्णायक सेटमध्ये सलग तीन गुण मिळवून ब्रेकपर्यंत सहा गुणांची आघाडी घेतली आणि नंतर ती कायम ठेवली. सेननं दोन मॅच पॉइंट वाचवले. पण त्याला चाऊला विजयापासून रोखता आलं नाही.
लक्ष्य सेननं गुरुवारी येथे साखळी सामन्यात विजय मिळवून इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. बँकॉकमधील थॉमस चषक स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपदाच्या वेळी भारतीय संघाचा भाग असलेल्या अल्मोराच्या 20 वर्षीय लक्ष्य सेननं जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या रासमुस गेमकेचा 54 मिनिटांत 21-18, 21-15 असा पराभव करत उपांतपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
पीव्ही सिंधूसमोर कडवं आव्हान
उपांत्यपूर्व फेरीत सिंधूसमोर कडवं आव्हान असणार आहे. थायलंडच्या रत्चानोक इंतानोन आणि स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोर यांच्यातील सामन्यात विजय मिळवणाऱ्या खेळाडूशी सिंधूचा सामना होणार आहे. आपल्या पुढील सामन्यात पीव्ही सिंधू कशी कामगिरी करून दाखवते? याकडं सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.
हे देखील वाचा-
- IND vs SA: आयपीएलमध्ये चमकले, पण टी-20 मध्ये फुटला घाम; चहलपासून भुवीपर्यंत सर्वच ठरले फ्लॉप!
- IND vs SA: 'मिलर'ची 'किलर' कामगिरी! 'इतक्या' वेळा जिंकलाय सामनावीराचा पुरस्कार, एबी डिविलियर्सलाही टाकलं मागं
- IND vs SA 1st T20: पहिल्याच टी-20 सामन्यात ऋषभ पंतनं मोडला धोनीचा विक्रम!