एक्स्प्लोर

IND vs SA 1st T20: पहिल्याच टी-20 सामन्यात ऋषभ पंतनं मोडला धोनीचा विक्रम!

IND vs SA 1st T20: केएल राहुलच्या (KL Rahul) दुखापतीनंतर ऋषभ पंतकडं संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं.

IND vs SA T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात ऋषभ पंतनं (Rishabh Pant) एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. केएल राहुलच्या (KL Rahul) दुखापतीनंतर ऋषभ पंतकडं संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवणारा ऋषभ पंत हा दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरलाय. सर्वात कमी वयात भारताचा कर्णधार बनण्याचा विक्रम माजी भारतीय खेळाडू सुरेश रैनाच्या (Suresh Raina) नावावर आहे. सुरेश रैनानं वयाच्या 23 वर्षे 197 दिवसांत भारताचं नेतृत्व केलं होतं.

ऋषभ पंतची नव्या विक्रमाला गवसणी
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऋषभ पंतनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं. त्यावेळी त्याचं वय 24 वर्षे 248 दिवस इतकं होतं. ज्यामुळं सुरेश रैनानंतर तो दुसरा सर्वात युवा कर्णधार ठरलाय, ज्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. जेव्हा महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा कर्णधार झाला, तेव्हा त्याचं वय 26 वर्षे 66 दिवस इतकं होतं. याशिवाय, ऋषभ पंत हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार असणारा चौथा विकेटकीपर ठरलाय. यापूर्वी सय्यद किरमाणी, राहुल द्विद आणि महेंद्रसिंह धोनीनं भारतीय संघाचं नेतृत्व केलंय.

भारताचे सर्वात युवा टी-20 संघाचा कर्णधार-

क्रमांक खेळाडूचं नाव वर्ष
1 सुरेश रैना 23 वर्ष 197 दिवस
2 ऋषभ पंत 24 वर्ष 248 दिवस
3 महेंद्रसिंह धोनी 26 वर्ष 68 दिवस
4 अजिंक्य रहाणे 27 वर्ष 41 दिवस
5 वीरेंद्र सेहवाग 28 वर्ष 42 दिवस

दिनेश कार्तिकची तीन वर्षानंतर भारतीय संघात एन्ट्री
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार कामगिरी करत दिनेश कार्तिकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या टी-20 मालिकेत त्याला संधी देण्यात आली. विशेष म्हणजे, तब्बल तीन वर्षानंतर त्यानं भारतीय संघात जागा मिळवली आहे. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पांड्याचंही भारतीय संघात पुनरागमन झालंय.  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सनं आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget