एक्स्प्लोर

मॅग्निफिशन्ट मेरी कोम... भारताची सुपरवूमन आणि सुपरमॉम

भारताची महिला बॉक्सर एमसी मेरी कोम सहाव्यांदा विश्वविजेती ठरली आहे. नवी दिल्लीतल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिनं 48 किलो वजनी गटाचं सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडवला. मेरी कोमचं जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतलं हे सहावं सुवर्णपदक असून, ती आजवरच्या इतिहासातली ती सर्वात यशस्वी बॉक्सर ठरली. तिनं अंतिम फेरीत युक्रेनच्या हॅना ओखोटाचा 5-0 असा पराभव केला.

मुंबई : मॅग्निफिशन्ट लेडी मेरी कोमनं जागतिक बॉक्सिंगमध्ये नवा इतिहास घडवला आहे. तिनं नवी दिल्लीतल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटाचं सुवर्णपदक जिंकलं. मेरी कोमनं अंतिम फेरीत युक्रेनच्या हॅना ओखोटाचा ५-० असा पराभव करून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. या कामगिरीनं जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या इतिहासातली ती सर्वात यशस्वी बॉक्सर ठरली. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या इतिहासात मेरी कोमचं हे आजवरचं सहावं सुवर्ण आणि एकंदर सातवं पदक ठरलं. तेही वयाच्या 35व्या वर्षी... लग्नानंतर तब्बल 13 वर्षांनी मिळवलेलं... तीन मुलांची आई झाल्यानंतरही एखादी भारतीय स्त्री बॉक्सिंगसारख्या खेळात सहाव्यांदा विश्वविजेती होत असेल तर तिला भारताची सुपरवूमन किंवा सुपरमॉमच म्हणायला हवं. आजच्या भारताला एक नाही तर अनेक महिला खेळाडूंनी ऑलिम्पिक आणि जागतिक पदकांची कमाई करून दिली आहे. पण त्यातही मॅग्निफिशन्ट लेडी मेरी कोमचं उदाहरण काही आगळंच आहे. मणिपूरसारख्या ईशान्येकडच्या दुर्गम राज्यात जन्माला आलेल्या मेरी कोमसाठी जीवन म्हणजे जणू संघर्षच होता. त्या संघर्षातून जीवनात यशस्वी व्हायचं तर मणिपूरची अनेक मुलंमुली खेळ हाच पर्याय निवडतात आणि मेरी कोमही त्याला अपवाद नव्हती. पण मेरी कोमनं निवडलेला खेळ हा बॉक्सिंग नव्हे तर अॅथलेटिक्स होता. पण 2000 साली मेरी कोम अपघातानंच बॉक्सिंगकडे वळली आणि त्या खेळाचीच होऊन गेली. आपण पाहूयात मेरी कोमनं मिळवलेल्या पदकांचा खजिना... मेरी कोमनं आजवरच्या कारकीर्दीत अनेक पदकांची लूट केली आहे. ती २००२, २००५, २००६, २००८, २०१० आणि २०१८ अशी एकूण सहावेळा बॉक्सिंगची वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. २००१ सालच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ती रौप्यपदकाची मानकरी ठरली होती. मेरी कोमनं महिलांच्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत पाच सुवर्णपदकं पटकावली आहेत. २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ती कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. त्याशिवाय मेरी कोमनं २०१० आणि २०१४ सालच्या एशियाडमध्येही अनुक्रमे कांस्य आणि सुवर्णपदकं जिंकलं. ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्टमध्ये तिनं यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचंही सुवर्णपदक आपल्या खजिन्यात जमा केलं. मेरी कोमच्या या यशाचं श्रेय तिनं पस्तिसाव्या वर्षी राखलेल्या फिटनेसला द्यावं लागेल. बॉक्सिंगसारख्या खेळात वाढत्या वयातही टिकून राहण्यासाठी आपल्या शरीरावर आणि सरावावर वेड्यासारखी मेहनत घेत असल्याचं तिनं नुकतंच सांगितलं होतं. या वयातही आपल्याला एखादी मोठी दुखापत नाही हे ती आपलं भाग्यच समजते. आपण एकदा एखादं लक्ष्य निश्चित केलं की मला माझा नवराही त्यापासून परावृत्त करु शकत नाही असं मेरी कोम हसत हसत सांगते. मेरी कोमचा हा फिटनेस... तिचा अथक सराव... आणि ताजं यश लक्षात घेतलं की प्रश्न पडतो आता पुढे काय...? तुमच्या आमच्या मनात त्याचं उत्तर असतं २०२० सालचं टोकियो ऑलिम्पिक. मेरी कोम मात्र सध्या टोकियो ऑलिम्पिकचा काहीच विचार करत नाहीय. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ती 48 किलो वजनी गटाचं सुवर्णपदक जिंकली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मात्र तो वजनी गटच नाही. टोकियोत खेळायचं तर मेरीसमोर पर्याय आहे तो ५१ किलो वजनी गटाचा. त्यासाठी तिला तीन किलो वजन वाढवावं लागणार आहे. येत्या दोन वर्षात मेरी कोमचं वय दोन वर्षांनी वाढणार आहे. याची तिला उत्तम कल्पना आहे. म्हणूनच ती म्हणते की पुढच्या दोन वर्षात मी सुपरफिट राहिली तरच २०२० साली ऑलिम्पिकच्या रणांगणात दाखल होईन. थोडक्यात काय... तर टोकियो ऑलिम्पिकमधला मेरी कोमचा सहभाग सध्या तरी निश्चित नाही. पण तुम्ही आम्ही मात्र मेरी कोमनं टोकियोत खेळावं आणि भारताला आणखी एक पदक जिंकून द्यावं असे मांडे खाऊ लागलो आहोत. त्यापेक्षा मेरी कोमच्या बॉक्सिंग भविष्याचा विचार आपण तिच्यावरच सोपवून, मेरी कोमनं आजवरच्या आयुष्यात आपल्याला आणि पर्यायानं भारत देशाला दिलेल्या आनंदासाठी तिचं ऋण मानणंच उत्तम ठरावं. थँक यू मेरी कोम.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?
IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?
Aryaman Birla RCB IPL 2026: 2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
RCB : राजस्थान रॉयल्सचा विक्रम RCB ने मोडला, आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, किती कोटींचा करार, नवा मालक कोण?
राजस्थान रॉयल्सचा विक्रम RCB ने मोडला, आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, किती कोटींचा करार, नवा मालक कोण?
BCCI : बीसीसीआयची मोठी कारवाई, इंग्लंडच्या स्टार खेळाडूवर 2 वर्षांची बंदी, आयपीएलमधून नाव मागं घेणं भोवलं
BCCI ची मोठी कारवाई, इंग्लंडच्या स्टार खेळाडूवर 2 वर्षांची बंदी, IPL मधून नाव मागं घेणं भोवलं

व्हिडीओ

Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीन ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीन ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
Monalisa And Farman Khan: 'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
Ashok Kharat and Devendra Fadnavis: अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
LPG Connection Booking: सिलेंडर बुकिंगसंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणताही नियम बदलला नाही, सरकारनं नेमकं काय सांगितलं?
एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 35 दिवस ही निव्वळ अफवाच, केंद्र सरकारनं नेमकं काय सांगितलं?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर, जाणून घ्या नवी अपडेट
लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर, जाणून घ्या
शेतकऱ्याचा नादच खुळा, लालऐवजी पिवळं अन् केशरी रंगाचं टरबूज; शेतीतला गोल्डन प्रयोग यशस्वी
शेतकऱ्याचा नादच खुळा, लालऐवजी पिवळं अन् केशरी रंगाचं टरबूज; शेतीतला गोल्डन प्रयोग यशस्वी
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
Embed widget