एक्स्प्लोर
भारताचं पॅरालिम्पिक पथक पंतप्रधानांच्या भेटीला
नवी दिल्लीः रिओ पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाने गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रिओ पॅरालिम्पिकमध्ये कामगिरी केलेल्या खेळाडूंचं पंतप्रधान मोदींनीही कौतुक केलं.
https://twitter.com/narendramodi/status/778947239188140032
रिओ पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीत विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई करणारा देवेंद्र झाझरिया, उंच उडीचं सुवर्णपदक मिळवणारा थांगावेलू मरियप्पन, उंच उडीचं कांस्यपदक जिंकणारा वरूण सिंह भाटी, तसंच गोळाफेकीत रौप्यपदक मिळवणारी दीपा मलिक यांच्यासह भारतीय पथकातील अन्य सदस्यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला.
https://twitter.com/narendramodi/status/778947010539851776
ब्राझिलच्या रिओ डी जनैरो शहरात झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 19 खेळाडू सहभागी झाले होते. त्यात चौघांनी पदकं मिळवली, तर तीन अॅथलीट्सना चौथं स्थान मिळालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
भारत
नागपूर
Advertisement