एक्स्प्लोर
चेन्नई ओपनचं नाव आता महाराष्ट्र ओपन, पुण्यात स्पर्धा खेळवणार!
भारतीय टेनिसची एकमेव एटीपी टूर्नामेंट चेन्नई ओपन आता यापुढे महाराष्ट्र ओपन म्हणून ओळखली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा आता पुढील वर्षापासून पुण्यात खेळवण्यात येईल.
मुंबई: भारतीय टेनिसची एकमेव एटीपी टूर्नामेंट चेन्नई ओपन आता यापुढे महाराष्ट्र ओपन म्हणून ओळखली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा आता पुढील वर्षापासून पुण्यात खेळवण्यात येईल.
या स्पर्धेचे हक्क विकत घेणाऱ्या आयएमजी रिलायन्स, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन यांनी याबाबतची घोषणा केली.
भारतीय टेनिस जगतातील मानाची 'चेन्नई ओपन' ही स्पर्धा पुढील वर्षापासून महाराष्ट्रातील पुण्यात खेळवण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली.
जागतिक स्तरावरील या स्पर्धेचं आम्ही महाराष्ट्रात स्वागत करतो, असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र ओपनचं यजमानपद मिळाल्याने आम्हाला आनंद आहे. या स्पर्धेला वर्षानुवर्षे वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न राहील, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
भारतीय क्रीडा क्षेत्रातील नामांकित टेनिस स्पर्धा म्हणून 'चेन्नई ओपन'कडे पाहिलं जात असे. गेल्या 21 वर्षांपासून जगातील सर्वोत्तम टेनिसपटू या स्पर्धेत भाग घेत आले आहेत.
इतकंच नाही तर 15 वेळा ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालनेही सुरुवातीच्या काळात चेन्नई ओपनमध्ये सहभाग घेतला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement