गुडन्यूज! अजिंक्य रहाणेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन
अजिंक्यची पत्नी राधिकानं आज मुलीला जन्म दिला. अजिंक्य रहाणेने बालपणीची मैत्रिण राधिकासोबत 26 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबईत लग्न केलं होतं. अजिंक्य
मुंबई : टीम इंडियाचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. अजिंक्यची पत्नी राधिकानं आज एका गोड मुलीला जन्म दिला आहे. भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगने आपल्या ट्विटरवरुन रहाणेला शुभेच्छा देत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. दरम्यान अजिंक्य सध्या विशाखापट्टणमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत आहे.
भारताचा फिरकीपटून हरभजन सिंगने अजिंक्य रहाणेला ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. हरभजनने म्हटलं, "अजिंक्य रहाणेला खुप शुभेच्छा. आशा करतो की आई आणि बाळ दोघेही छान असतील. त्यांच्या जीवनातील नवा सुंदर भाग सुरु होत आहे." हरभजनच्या ट्वीटनंतर अजिंक्य आणि राधिकाला अनेक जण शुभेच्छा देत आहेत.
Congratulations new daddy in town @ajinkyarahane88 hope Mum and lil princess ???? are doing well.. fun part of life starts now ajju. #fatherhood
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 5, 2019
अजिंक्य रहाणेने बालपणीची मैत्रिण राधिकासोबत 26 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबईत लग्न केलं होतं. अजिंक्य रहाणेनं आपण बाप होणार असल्याची गुड न्यूज जुन महिन्यात दिली होती. त्याने सोशल मीडियावर राधिकासोबतचे काही फोटो शेअर केले होते.
अजिंक्य रहाणेचा आता महेंद्रसिंह धोनी, हरभजन सिंग, सुरेश रैना, रोहित शर्मा यांच्या पंक्तीत समावेश झाला आहे. हे खेळाडू देखील मुलीचे बाप आहेत.