एक्स्प्लोर

Age is Just Number! चाळीशीतही शरथची सुवर्णपदकाला गवसणी, 2006 पासून जिंकली आहेत 7 गोल्ड मेडल्स

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसपटू शरथ कमल याने पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

Achanta Sharath Kamal in CWG : भारताचा आघाडीचा टेबल टेनिस स्टार अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) याने 40 वर्षे वय असताना नुकतीच सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. पुरुष एकेरीमध्ये शरथने इंग्लंडच्या लियाम पीचफोर्डला मात देत ही कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर शरथने सर्वांसमोर एक नवं प्रेरणादायी उदाहरण ठेवलं आहे. विशेष म्हणजे कॉमनवेल्थ गेम्समधील शरथचं हे सातवं सुवर्णपदक असून 2006 पासून तो पदकांना गवसणी घालत आहे. 2006 साली 24 वर्षे वय असल्यापासून आता 40 वर्षाचा असतानाही तो पदकं जिंकत आहे.

5 कॉमनवेल्थ स्पर्धा अन् 13 पदकं 

शरथ कमलने 2006 साली सर्वात आधी मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. त्यावेळी त्याचं वय 24 वर्षे इतकं होतं. त्याचवर्षी त्याने टेबल टेनिस सांघिक स्पर्धेतही गोल्ड जिंकलं होतं. त्यानंतर 2010 साली भारतात झालेल्या कॉमनवेल्थ खेळात पुरुष एकेरी आणि सांघिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं असून पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर 2014 सालच्या ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये केवळ पुरुष दुहेरीत त्याने रौप्यपदक जिंकलं. त्यानंतर 2018 सालच्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थमध्ये शरथने पुरुष एकेरीत कांस्य, पुरुष दुहेरीत रौप्य आणि सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. ज्यानंतर आता नुकत्याच पार पडलेल्या बर्मिंगहम कॉमनवेल्थमध्येतर शरथने पुरुष एकेरी, मिक्स्ड डबल आणि सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. तर पुरुष दुहेरीतही त्याने रौप्य पदकाला गवसणी घातली. अशाप्रकारे 2006 ते 2022 सालपर्यंत झालेल्या प्रत्येक कॉमनवेल्थमध्ये शरथने पदक जिंकत एकूण 13 पदकं जिंकली असून त्यातील 7 सुवर्णपदकं आहेत.    

2022 मध्ये शरथची 'कमाल'

शरथने यंदा पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं . त्याने इंग्लंडच्या लियाम पीचफोर्ड याला 11-13, 11-7, 11-2, 11-6, 11-7 च्या फरकाने पराभूत करत सुवर्ण जिंकले आहे. याशिवाय टेबल टेनिसमध्ये भारताचा पुरुष दुहेरी संघ अंतिम सामन्यात पराभूत झाल्यामुळे भारताला गोल्ड मिळालं नसलं तरी रौप्यपदक मिळालं आहे. अचंता शरथ कमल आणि साथियान गनसेकरन या जोडीला फायनलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला आहे.  अंतिम सामन्यात अचंता आणि साथियान यांनी चांगली झुंज दिली पण इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल आणि लियाम पीचफोर्ड यांनी अधिक दमदार खेळ दाखवत विजय मिळवला. 11-8, 8-11, 3-11, 11-7 आणि 4-11 अशा फरकाने हा सामना त्यांनी जिंकला. तसंच मिश्र दुहेरीत शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी जेवेन चुंग आणि कॅरेन लीन या मलेशियाच्या जोडीचा 11-4, 9-11, 11-5, 11-6 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. त्याने हा सामना 4-1 ने जिंकला.  

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget