एक्स्प्लोर
IPL 2018: गेलचा झंझावात, पंजाबची हैदराबादवर मात
किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल या विजयाचा हिरो ठरला.
मोहाली: किंग्स इलेव्हन पंजाबनं मोहालीतल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 15 धावांनी मात केली. पंजाबचा हा चार सामन्यांमधला तिसरा विजय ठरला.
किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल या विजयाचा हिरो ठरला. त्याने 63 चेंडूत 104 धावा ठोकत, आयपीएलच्या यंदाच्या मोसमातलं पहिलं शतक नावावर केलं.
या सामन्यात पंजाबनं हैदराबादला विजयासाठी 194 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकांत चार बाद 178 धावांचीच मजल मारता आली.
सेहवागचा निर्णय गेलने सार्थ ठरवला!
सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यम्सन आणि मनीष पांडे यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. पंजाबकडून मोहित शर्मा आणि अँड्र्यू टायनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
गेल पहिला शतकवीर
किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला पहिला शतकवीर ठरला. त्यानं सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेऊन, 58 चेंडूंत शतक साजरं केलं. या सामन्यात गेलनं अवघ्या 63 चेंडूंत एक चौकार आणि अकरा षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी उभारली.
गेलचं हे आयपीएलमधलं आजवरचं सहावं शतक ठरलं. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सहा शतकांचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. त्याखालोखाल विराट कोहलीनं चार शतकं झळकावली आहेत.
2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना गेलने पुणे वॉरिअर्स इंडिया विरोधात 175 धावांची नाबाद खेळी केली होती, हा आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम गेलच्या नावे जमा आहे.
याशिवाय आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार (265), एका डावातील सर्वाधिक षटकार (पुणे संघाविरोधात 2013 मध्ये 17 षटकार), सर्वात जलद शतक (पुणे संघाविरोधात 2013 मध्ये 30 चेंडूंत शतक) हे विक्रमही गेलच्या नावे जमा आहेत.
संबंधित बातम्याHere’s to yet another Gaylestorm ???? @henrygayle#LivePunjabiPlayPunjabi #KingsXIPunjab #KXIP #VIVOIPL pic.twitter.com/sixUgw1pcd
— Kings XI Punjab (@lionsdenkxip) April 19, 2018
IPL 2018 मधील पहिलं शतक गेलचं! लेकीला सेंच्युरी डेडिकेट
सेहवागचा निर्णय गेलने सार्थ ठरवला!अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement