एक्स्प्लोर
Advertisement
आम्ही ऑस्ट्रेलियात डे-नाईट कसोटी खेळणार नाही: बीसीसीआय
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक संघाच्या कार्यक्रमात दिवसरात्रीच्या कसोटी सामन्याचा समावेश करण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असतो.
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया दिवसरात्रीच्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अधिकृतरित्या कळवलं आहे.
टीम इंडिया या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक संघाच्या कार्यक्रमात दिवसरात्रीच्या कसोटी सामन्याचा समावेश करण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असतो.
त्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री बीसीसीआयच्या प्रशासकांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली.
गुलाबी चेंडूनं दिवसरात्रीच्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी किमान 18 महिने तयारीची आवश्यकता असल्याचं शास्त्री यांनी बीसीसीआयला पटवून दिलं. त्यानंतरच बीसीसीआयनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पत्र लिहून, टीम इंडिया दिवसरात्रीच्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं कळवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement