एक्स्प्लोर

विराटनंतर जाडेजाचंही शतक, भारताचा पहिला डाव 649 धावांवर घोषित

भारतीय फलंदाजांनी राजकोट कसोटीत धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. पहिल्या दिवशी पृथ्वी शॉने, तर दुसऱ्या दिवशी विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाने शतक ठोकलं.

राजकोट : टीम इंडियाच्या फलंदाजांनी राजकोट कसोटीत धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. कर्णधार विराट कोहलीपाठोपाठ डावखुरा अष्टपैलू रवींद्र जाडेजानेही या कसोटीत शतक ठोकलं. त्याचं हे कसोटी क्रिकेटमधलं पहिलंवहिलं शतक ठरलं. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने नऊ बाद 649 धावांवर डाव घोषित केला. या कसोटीत भारताच्या रिषभ पंतचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं, पण विराट कोहलीने सवयीने शतक झळकावलं. विराट आणि रिषभ पंतने पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी रचली. या भागिदारीत पंतचा वाटा 92 धावांचा होता. त्याच्या 84 चेंडूंमधल्या खेळीला आठ चौकार आणि चार षटकारांचा साज होता. विराटने दहा चौकारांसह 139 धावांची खेळी उभारली. रवींद्र जाडेजाने 132 चेंडूंत आपलं शतक साजरं केलं. विराटच्या सलग तिसऱ्या कॅलेंडर वर्षात एक हजार धावा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सलग तिसऱ्या कॅलेंडर वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. ही कामगिरी बजावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. विराटने राजकोट कसोटीत 139 धावांची खेळी उभारली. विराटने 121 वी धाव घेऊन, 2018 या कॅलेंडर वर्षात एक हजार धावांचा टप्पा गाठला. त्याच्या खात्यावर वर्षभरात नऊ कसोटी सामन्यांमध्ये 1018 झाल्या धावा आहेत. टीम इंडियाच्या कर्णधाराने गेल्या दोन कॅलेंडर वर्षात अनुक्रमे 12 कसोटी सामन्यांत 1215 धावा आणि 10 कसोटी सामन्यांत 1059 धावा अशी कामगिरी बजावली आहे. पृथ्वी शॉचं पदार्पणात शतक मुंबईच्या पृथ्वी शॉने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून राजकोट कसोटीत पदार्पणात शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात शतक ठोकणारा पृथ्वी शॉ हा पंधरावा भारतीय फलंदाज ठरला. त्याने 99 चेंडूंत पंधरा चौकारांच्या सहाय्याने आपलं शतक साजरं केलं. पहिल्या दिवशी चहापानाआधीच्या अखेरच्या षटकात देवेंद्र बिशूने पृथ्वी शॉला माघारी धाडलं. बिशूने स्वत:च्याच गोलंदाजीवर त्याचा झेल पकडला. पृथ्वीने 154 चेंडूंत 19 चौकारांसह 134 धावांची खेळी उभारली. संबंधित बातम्या :
विंडीज गोलंदाजांची ‘पृथ्वी’ प्रदक्षिणा, खणखणीत शतकासमोर लोंटागण!
'लड़के में बहुत दम है,' सेहवागचं ट्वीट, पृथ्वीवर शुभेच्छांचा 'शॉ'वर

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Verma Maharashtra Vidhan Bhavan For Vikram Kakade Oath Video: टीम इंडियाचा मॅचविनर तिलक वर्मा शपथविधीसाठी थेट महाराष्ट्र विधानपरिषदेत; मित्र आमदार बनल्याने खास उपस्थिती, म्हणाला तो माझा भाऊच!
टीम इंडियाचा मॅचविनर तिलक वर्मा शपथविधीसाठी थेट महाराष्ट्र विधानपरिषदेत; मित्र आमदार बनल्याने खास उपस्थिती, म्हणाला तो माझा भाऊच!
Rishabh Pant: रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? रिपोर्टमध्ये नवा दावा
रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? 
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Rovman Powell News : 6, 6, 6, 6, 6 अन् OUT! 'त्या' 5 वादळी षटकांनंतर... एका चुकीने सगळाच खेळ पलटला! 6व्या बॉलवर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
6, 6, 6, 6, 6 अन् OUT! 'त्या' 5 वादळी षटकांनंतर... एका चुकीने सगळाच खेळ पलटला! 6व्या बॉलवर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे
Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Sangli Vidhan Parishad Election Result 2026: सातारा- सांगलीत फुटलेल्या 100 मतांवरुन महायुतीत वादाची ठिणगी, जयकुमार गोरेंच्या निशाण्यावर शंभूराज देसाई
सातारा- सांगलीत फुटलेल्या 100 मतांवरुन महायुतीत वादाची ठिणगी, जयकुमार गोरेंच्या निशाण्यावर शंभूराज देसाई
Omraje Nimbalkar and Eknath Shinde: ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, धाराशिवमधील सर्व संघटनांच्या कार्यकारिणी बरखास्त
ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, धाराशिवमधील सर्व संघटनांच्या कार्यकारिणी बरखास्त
Pune Crime News: मध्य प्रदेशातून मागवायचा गावठी कट्टे अन्...; सोशल मिडीयावरून पिस्तुल विकणारा 'बबलू' अखेर गजाआड; पुणे गुन्हे शाखेची लातूरमध्ये मोठी कारवाई
मध्य प्रदेशातून मागवायचा गावठी कट्टे अन्...; सोशल मिडीयावरून पिस्तुल विकणारा 'बबलू' अखेर गजाआड; पुणे गुन्हे शाखेची लातूरमध्ये मोठी कारवाई
Pune Crime News :
"आम्ही अनेक वेळा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न...", पुण्याच्या गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे बिश्नोई गँगसोबत, पोलिसांनी दिली मोठी माहिती
Video: काल जोर का झटका दिलाय, संतुलन बिघडलंय त्यांचं, विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
Video: काल जोर का झटका दिलाय, संतुलन बिघडलंय त्यांचं, विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
Mumbai Rain Updates: मुंबईसाठी पुढील 2 ते 3 तास महत्वाचे, हवामान विभागाची महत्वाची माहिती; कोकणातही पावसाचा जोर वाढला!
मुंबईसाठी पुढील 2 ते 3 तास महत्वाचे, हवामान विभागाची महत्वाची माहिती; कोकणातही पावसाचा जोर वाढला!
Tukaram Munde Akola: टीप मिळाली अन् मध्यरात्रीच्या सुमारास तुकाराम मुंढेंच्या पथकाची मोठी कारवाई; लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह 12 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
टीप मिळाली अन् मध्यरात्रीच्या सुमारास तुकाराम मुंढेंच्या पथकाची मोठी कारवाई; लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह 12 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
Gokul Gite: भविष्यात पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर...; गोकुळ गीतेंचा शिंदे-सामंतांसमोरच मोठा शब्द, नेमकं काय-काय म्हणाले?
भविष्यात पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर...; गोकुळ गीतेंचा शिंदे-सामंतांसमोरच मोठा शब्द, नेमकं काय-काय म्हणाले?
Embed widget