एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

India vs West Indies : विराटसेनेकडून विंडीजचा 67 धावांनी धुव्वा; विजयासह मालिकाही खिशात

विराट कोहलीच्या टीम इंडियानं वानखेडेच्या निर्णायक टी-ट्वेन्टीत विंडीजचा 67 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात झालेल्या तीन टी-ट्वेन्टीत मालिकेत भारताने 2-1 अशी मालिकाही जिंकली आहे.

मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियानं वानखेडेच्या निर्णायक टी-ट्वेन्टीत विंडीजचा 67 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांची ही मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात विंडीजसमोर 241 धावांचं मोठं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला आठ बाद 173 धावांचीच मजल मारता आली. विंडीजकडून कर्णधार कायरन पोलार्डनं 68 धावा करुन एकाकी झुंज दिली. भारताकडून कुलदीप यादव, भुवनेश्वर आणि दीपक चहरनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करत पोलार्डचा निर्णय चुकीचा ठरवला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी चौफेर फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी 135 धावा जोडल्या. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. रोहित शर्मा 71 धावांवर तंबूत परतल्यानंतर विराट कोहली ऐवजी ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. मात्र, या संधीचं सोनं पंतला करता आले नाही. पोलार्डच्या गोलंदाजीवर पंत शून्यावर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने लोकेश राहुलच्या साथीने फटकेबाजी करत भारताला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराटने आक्रमक फटकेबाजी करत विंडीजच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. राहुल 91 धावा काढून अखेरच्या षटकात माघारी परतला. याआधी रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीमुळे टीम इंडियानं 20 षटकात तीन बाद 240 धावांचा डोंगर उभारला. रोहित आणि राहुलनं सलामीच्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी रचली. रोहितनं 34 चेंडूत 71 धावा कुटल्या. त्यानंतर विराट आणि राहुलनं तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची उभारली. लोकेश राहुलनं 56 चेंडूत 91 धावा फटकावल्या तर विराट कोहलीनं अवघ्या 29 चेंडूत चार चौकार आणि सात षटकारांसह नाबाद 70 धावांची खेळी साकारली. रोहित शर्माचा विक्रम - टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकारांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा रोहित हा आजवरचा तिसराच क्रिकेटर ठरला. शेल्डन कॉटरेलच्या गोलंदाजीवर मिडविकेटच्या दिशेनं षटकार खेचत रोहितनं आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीनं चारशे पेक्षा जास्त षटकार ठोकले होते. गेलच्या खात्यात 534 तर आफ्रिदीच्या खात्यात 476 षटकार जमा आहेत. संबंधित बातम्या - रणजीचा रणसंग्राम | विदर्भाला आघाडी, मुंबईची आघाडीकडे कूच, महाराष्ट्र अडचणीत MS Dhoni | महेंद्रसिंह धोनी संघात कमबॅक कधी करणार? रवी शास्त्री म्हणातात.... Virat Kohli | क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Embed widget