एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

विंडीजविरुद्ध आज पहिली कसोटी, टीम इंडियासह प्रशिक्षक कुंबळेचीही परीक्षा

अँटिगा: अनिल कुंबळेच्या तालमीत नव्या आत्मविश्वासानं भरलेली टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्याच्या आव्हानाला सामोरी जाण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि विंडीज संघांमधल्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून अँटिगामध्ये सुरुवात होत आहे.   कधी ड्रम सेशन... कधी व्हॉलीबॉल... तर कधी साखळी साखळी... भारतीय संघाच्या टीम बॉण्डिंगसाठी कुंबळे गुरुजींनी सरावात प्रयोगांची जणू मालिकाच राबवली. कुंबळे गुरुजींच्या या प्रयोगांनी टीम इंडियाच्या फिटनेस आणि आत्मविश्वासात नक्कीच मोलाची भर घातली आहे. आता विंडीज दौऱ्याच्या आव्हानाला सामोरी जाण्याच्या दृष्टीनं कोहली अँड कंपनी किती कणखर बनली आहे, याची पहिली परीक्षा अँटिगाच्या मैदानात होणार आहे. अँटिगातली ही परीक्षा केवळ टीम इंडियाचीच नाही, तर कुंबळे गुरुजींचीही पहिली परीक्षा असेल.   विराट कोहलीची टीम इंडिया आणि जेसन होल्डरची वेस्ट इंडियन फौज यांच्यामधला पहिला कसोटी सामना आजपासून अँटिगाच्या सर व्हिव रिचर्डस स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत वेस्ट इंडिजच्या तुलनेत विराट अँड कंपनीचं पारडं बरंच जड आहे आणि विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरनंही ही बाब मान्य केली आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या टीम इंडियाची फलंदाजी आणि गोलंदाजी उच्च दर्जाची आहे. तसंच भारतीय संघाच्या तुलनेत विंडीजचा संघ हा तरुण आणि अननुभवी आहे. त्यामुळं भारताचं आव्हान आमच्यासाठी कठीण असल्याचं होल्डरनं म्हटलं होतं. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला वाटणारी चिंता नक्कीच चुकीची नाही.   64 कसोटी खेळणारा मार्लन सॅम्युअल्स, 42 कसोटी सामने खेळणारा डॅरेन ब्राव्हो आणि 24 कसोटी खेळणारा क्रेग ब्रॅथवेट यांचा अपवाद सोडला, तर विंडीज संघातला एकही खेळाडू 15 कसोटी सामने खेळलेला नाही. सॅम्युअल्स आणि ब्राव्होलाही आजवरच्या कसोटी कारकीर्दीत सातत्यपूर्ण कामगिरी बजावता आलेली नाही. वेस्ट इंडिज संघातल्या तेरा खेळाडूंच्या नावावर मिळून एकूण 187 कसोटी सामने जमा आहेत, त्याउलट भारताच्या एकट्या ईशांत शर्मानंच 68 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.   टीम इंडियानं गेल्या दहा वर्षांमध्ये दोनवेळा वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. 2006 साली राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली आणि मग 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं कसोटी मालिका जिंकली होती. आता कॅरिबियन भूमीवर सलग तिसरी कसोटी मलिका जिंकण्याचा विराट कोहलीच्या टीम इंडियाचा प्रयत्न आहे.   विशेष म्हणजे विराट कोहलीच्याच नेतृत्त्वाखाली भारतानं गेल्या वर्षी कसोटी मालिकेत श्रीलंकेवर 2-1 असा तर दक्षिण आफ्रिकेवर 3-0 असा विजय साजरा केला होता. त्यामुळं विराट कोहलीच्या टीम इंडियाला कॅरिबियन बेटांवरच्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या कसोटी मालिका विजयाची हॅटट्रिक साजरी करण्याची संधी आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
PSL 2026 : कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
IPL Points Table 2026 : डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?
डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Embed widget