एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट: विराट कोहली- वांड मुलाची वांड शतकं!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावर विराट कोहलीचा उदय झाला, त्या वेळी एक वांड मुलगा म्हणूनच त्याची अधिक ओळख झाली होती. त्याच्या अरेला कारे करण्याच्या वृत्तीला अनेकांनी नाकं मुरडली होती.

कोलकाता: श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत शतक ठोकून, भारताचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं नावावर केली आहेत. कोहलीचं आजचं कसोटीतील 18 वं शतक होतं. दुसरीकडे त्याची वन डे मध्ये 32 शतकं आहेत. अशी एकूण 50 शतकं कोहलीने झळकावली आहेत. गेल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत विराट कोहलीनं एक फलंदाज, एक कर्णधार आणि एक स्पोर्टस ब्रॅण्ड म्हणून गाठलेली उंची आपल्याला कधीच नाकारता येणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावर विराट कोहलीचा उदय झाला, त्या वेळी एक वांड मुलगा म्हणूनच त्याची अधिक ओळख झाली होती. त्याच्या अरेला कारे करण्याच्या वृत्तीला अनेकांनी नाकं मुरडली होती. विराटची गुणवत्ता दिसत असूनही, त्याला थोरामोठ्यांच्या पंक्तीत बसवण्याची जाणकारांची तयारी नव्हती. पण २०१२ सालच्या आयपीएलमधल्या अपयशानं विराटच्या वृत्तीला... त्याच्या आयुष्याला शिस्तीचं वळण दिलं. म्हणूनच आजचा सुपर अॅथलीट विराट हा जगासाठी सुपर क्रिकेटर ठरला आहे. स्पेशल रिपोर्ट: विराट कोहली- वांड मुलाची वांड शतकं! शतकांचं अर्धशतक विराट कोहली... वयाच्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय शतकांचं अर्धशतक साजरं करणारा फलंदाज विराट कोहली... पन्नास आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतला आठवा फलंदाज विराट कोहली... कसोटी क्रिकेटमध्ये अठरा शतकं साजरी करणारा फलंदाज विराट कोहली... टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत नंबर वन मिळवून देणारा फलंदाज आणि कर्णधारही... विराट कोहली... वन डे फलंदाजांच्या क्रमवारीतला नंबर वन... विराट कोहली... वन डेत नऊ हजार धावांचा पल्ला सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज... विराट कोहली... वन डेत सर्वाधिक शतकांच्या शर्यतीत आता नंबर दोनचा फलंदाज... विराट कोहली... ट्वेन्टी ट्वेन्टी फलंदाजांच्या क्रमवारीतही नंबर वन आहे तो विराट कोहलीनं कोलकाता कसोटीत कर्णधारास साजेशी खेळी करून आंतरराष्ट्रीय शतकांचं अर्धशतक साजरं केलं. त्याच्या या झुंजार खेळीनं टीम इंडियाला पराभवाच्या संकटातूनही वाचवलं. स्पेशल रिपोर्ट: विराट कोहली- वांड मुलाची वांड शतकं! विराट एक ब्रॅण्ड फॉरमॅट कोणताही असो, क्रिकेटच्या मैदानात विराट कोहलीच्या यशाचा आलेख चढत्या भाजणीनं उंचावत आहे. आणि त्याचंच प्रतिबिंब जाहिरातींच्या दुनियेतही पडलेलं दिसत आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराची ब्रॅण्ड व्हॅल्यूही त्याच्या नावाला साजेशी अशी विराट झाली आहे. हेही वाचा -   विराट कोहली... फिटनेस... आणि बीप टेस्ट फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीनुसार जगातल्या सर्वात महागड्या स्पोर्टस ब्रॅण्डच्या यादीत विराट कोहली सातव्या स्थानावर दाखल झाला आहे. गेल्या वर्षी या यादीत महेंद्रसिंग धोनी दहाव्या स्थानावर होता. त्यावेळी धोनीचं ब्रॅण्ड मूल्य भारतीय चलनात अंदाजे ७१ कोटी रुपये होतं. पण यंदा धोनीऐवजी विराटनं टॉप टेन स्पोर्टस ब्रॅण्डमध्ये स्थान मिळवलं आहे. विराटचं ताजं ब्रॅण्ड मूल्य ९४ कोटी रुपये आहे. आणि विशेष म्हणजे त्याचं ब्रॅण्ड मूल्य स्टार फुटबॉलवीर लायनेल मेसीपेक्षाही दहा लाख डॉलर्सनी अधिक आहे. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे साडेसहा कोटी रुपयांच्या घरात जाते. देखणा, सुपरफिट आणि यशस्वी जाहिरातींच्या दुनियेत विराट कोहली हा स्पोर्टस ब्रॅण्ड यंदा लखलखताना दिसत आहे याचं कारण त्याच्या वाढत्या लोकप्रियेत दडलं आहे. अर्थात कुणाचीही लोकप्रियता ही अचानक वाढत नाही. त्यामागं काहीतरी सबळ कारणं असावी लागतात. जाणकार म्हणतात की, विराटनं अजूनही वयाची तिशी गाठलेली नाही. तो तरुण आहे... देखणा आहे... सुपरफिट आहे आणि यशस्वीही. विराटची आक्रमक देहबोली, त्याचा नीडरपणा ही वैशिष्ट्यं तरुणाईला आणि त्यातही मुलींना जास्त भावतात. त्यामुळंच त्याची लोकप्रियता ही सातत्यानं वाढताना दिसत आहे. साहजिकच विराट कोहली नावाच्या ब्रॅण्डला जगाच्या बाजारात आलेली किंमत ही त्यानं क्रिकेटच्या मैदानात मिळवलेलं यश आणि त्याची लोकप्रियता याचाच संगम आहे. Virat विराटचा फिटनेस विराट कोहलीचं क्रिकेटच्या मैदानातलं यश आणि त्याची अमाप लोकप्रियता यामागं त्यानं गेल्या पाच वर्षांत जाणीवपूर्वक घेतलेली मेहनत आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी सुपर फिटनेसबाबत दिलेल्या सल्ल्यानं खरं तर विराटला उघडा डोळे, बघा नीटचा पहिल्यांदा साक्षात्कार झाला. पण २०१२ सालच्या आयपीएलच्या अपयशानंच त्याचे डोळे खरोखरच उघडले. तोवर विराटची फिटनेससाठीची मेहनत जेमतेमच होती. त्याच्या खाण्यापिण्यावर कसलंही बंधन नव्हतं. रात्री जागवूनही आपण हमखास चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो ही त्याची मानसिकता होती. पण २०१२ सालच्या आयपीएलमधल्या अपयशानं विराटला खरोखरच जमिनीवर आणलं. स्वत:ला बदललं त्या दिवशी विराटनं स्वत:ला आरशात निरखून पाहिलं. आजच्या तुलनेत त्याचं वजन तब्बल ११-१२ किलोनं जास्त होतं. हे शरीर आणि चुकीच्या सवयी घेऊन आपण तिन्ही फॉरमॅट्मध्ये दीर्घकाळ वर्चस्व गाजवू शकणार नाही, याची विराटला जाणीव झाली आणि त्यानं स्वत:ला बदलायचं ठरवलं. स्पेशल रिपोर्ट: विराट कोहली- वांड मुलाची वांड शतकं! तो रोज दीड तास जिममध्ये मेहनत घेऊ लागला. त्यानं खाण्यापिण्यावर सक्त बंधनं आणली. तो फक्त सकस आहार घेऊ लागला. शीतपेयं, आईस्क्रीम यावर तर त्यानं फुलीच मारली. विराटला बदललेल्या मानसिकतेचे रिझल्ट्स तातडीनं मिळाले. मग २०१५ साली त्यानं आपला व्यायाम आणखी वाढवला. एखाद्या वेटलिफ्टरला साजेसं हेवी वेटट्रेनिंगही त्याच्या व्यायामाचा भाग बनलं. याच कठोर मेहनतीनं विराटला एक सुपर अॅथलीट बनवलंय. विराट कोहलीमधला सुपर अॅथलीटच आज त्याला यशाच्या आणि लोकप्रियतेच्याही शिखरावर घेऊन गेला आहे. विजय साळवी, एबीपी माझा, मुंबई संबंधित बातम्या कसं बदललं विराट कोहलीचं आयुष्य? 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget