एक्स्प्लोर
Advertisement
IndvsPak Final CT 2017: पाकला चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद
लंडन: जगाचं लक्ष लागलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाकिस्तानने आपलं नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानने टीम इंडियाचा तब्बल 180 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानला पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळालं.
पाकिस्तानी संघाने ठेवलेलं 339 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य पार करताना भारताची चांगलीच दमछाक झाली. हार्दिक पांड्याच्या 76 धावांच्या बळावर भारताला सर्वबाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.
टीम इंडियाच्या पहिल्या फळीला फारशी चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. मात्र हार्दिक पांड्याने चौकार, षटकारांच्या बळावर 76 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताची आशा काही काळ जिवंत झाली होती, मात्र चोरटी धाव काढण्याच्या नादात पांड्या रनआऊट झाला आणि ती आशाही मावळली.
सलामीवीर रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर शिखर धवनही अवघ्या 21 धावांसह तंबूत परतला. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही अवघ्या 5 धावांसह स्वस्तात माघारी परतला.
भारताची मदार असलेला सिक्सरकिंग युवराज 22, तर धोनी अवघ्या 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर मिडल ऑर्डरमधला केदार जाधवही 9 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने मात्र 76 धावांची खेळी केली. तळाचे फलंदाज जाडेजा(15), अश्विन(1), बुमरा (1), भुवनेश्वर (1*) फारशी चमक दाखवू शकले नाहीत.
-----------------------------
भारताला नववा धक्का, अश्विन अवघ्या एका धावेवर बाद
भारताला आठवा धक्का, रविंद्र जाडेजा 15 धावांवर माघारी
भारताला सातवा धक्का, हार्दिक पांड्या 76 धावांवर धावबाद
भारताला सहावा धक्का, केदार जाधव 9 धावांसह बाद
भारताला मोठा धक्का, धोनी अवघ्या 4 धावा करुन माघारी
भारताला चौथा धक्का, सिक्सरकिंग युवराज 22 धावांवर बाद
भारताला तिसरा धक्का, कोहली स्वस्तात माघारी, अवघ्या 5 धावांवर तंबूत
भारताला दुसरा धक्का, शिखर धवन 21 धावांवर बाद
भारताला जबरदस्त धक्का, हिटमॅन रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद
----------------------------
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेगाफायनलमध्ये पाकिस्तानने भारतासमोर 339 धावांचं लक्ष्य ठेवलं असून, भारतीय फलंदाजीला सुरुवात झाली आहे. पण पहिल्याच षटकात भारताला पहिला धक्का बसला आहे. रोहित शर्माला शून्यावर माघारी परतावं लागलं आहे. तर त्या पाठोपाठ आलेला कर्णधार विराट कोहलीलादेखील स्वस्तात माघारी जावं लागलं.
सलामीवीर फकर झमानचं खणखणीत शतक, अझर अली आणि मोहम्मद हाफिजच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने निर्धारित 50 षटकांत 4 विकेट्स गमावून 338 धावा केल्या. बोथट गोलंदाजीमुळे भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानी फलंदाजांना वेसण घालता आली नाही.
या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून सलामीसाठी आलेल्या फकर झमान आणि अझर अली यांची जोडी जम धरत असतानाच, बुमराहने एका अप्रतिम चेंडूवर फकरला धोनीकडे झेल देण्यास भाग पाडलं. मात्र बुमराहचा तो बॉल 'नो बॉल' ठरला. त्यावेळी फकर अवघ्या तीन धावांवर होता.
यानंतर मग फकर-अझरने अप्रतिम फलंदाजी करत, भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. या जोडीने 128 धावांची सलामी दिली.
-----------------------------
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारताने संघात कोणताही बदल केलेला नाही.
भारताला चौथं यश, बाबर आझम (46) बाद, पाकिस्तान 267/4 (42.3)
भारताला तिसरं यश, शोएब मलिक बाद
भारताला दुसरं यश मिळालं. फकर झमान (114) धावा करुन बाद झाला.
पाकिस्तानचा सलामीवर फकर झमानने खणखणीत शतक ठोकलं आहे. झमानने 93 चेंडूंत 100 धावा केल्या.
पाकिस्तानचे सलामीवीर फकर झमन आणि अझर अली यांनी धडाकेबाज सुरुवात केली. या जोडीने शंभर धावांचा टप्पा ओलांडला. या जोडीने वैयक्तिक अर्धशतकं झळकवाली. मात्र एक चोरटी धाव घेण्याच्या नादात अझर अली धावबाद झाला.
सुरुवातीच्या षटकात बुमराने फकरला धोनीकरवी झेलबाद केलं होतं. मात्र बुमराहने फेकलेला तो चेंडू नो बॉल ठरला. त्याचाच फायदा पाकिस्तानने उचलला आहे.
- भारतीय संघ - रोहित, धवन, कोहली, युवराज, धोनी, केदार, पांड्या, जाडेजा, अश्विन, भुवी, बुमराह
- पाकिस्तानी संघात एक बदल, रुमान रईसऐवजी मोहम्मद आमीरचं पुनरागमन
- फकर 22*, अझर 30*, पाकिस्तान 63/0 (11)
- फकर 27*, अझर 31*, पाकिस्तान 69/0 (12)
- फकर 33*, अझर 40*, पाकिस्तान 86/0 (15)
- फकर 36*, अझर 44*, पाकिस्तान 93/0 (17)
- फकर 42*, अझर 48*, पाकिस्तान 103/0 (19)
- अझर अली आणि फकरची अर्धशतकं, पाकिस्तान 114/0 (20)
- फकर 54*, अझर 58*, पाकिस्तान 125/0 (22)
- भारताला पहिलं यश, अझर अली (59) धावबाद, पाकिस्तान 128/1 (23)
- फकर 61*, बाबर 1*, पाकिस्तान 134/1 (25)
- फकर 76*, बाबर 2*, पाकिस्तान 150/1 (26)
- फकर 89*, बाबर 4*, पाकिस्तान 167/1 (27)
- फकर 94*, बाबर 7*, पाकिस्तान 175/1 (28)
- फकर 95*, बाबर 7*, पाकिस्तान 176/1 (29)
- पाकिस्तानचा सलामीवर फकर झमानने खणखणीत शतक ठोकलं आहे. झमानने 93 चेंडूंत 100 धावा केल्या.
- भारताला दुसरं यश, फकर झमान (114) बाद, पाकिस्तान 200/2 (33.1)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement