एक्स्प्लोर

India vs New Zealand : टीम इंडियाला रणनीतीला न्यूझीलंडचा सुरुंग! रचिन रविंद्रचा कॅच महागात अन् मिशेल पुन्हा नडला

India vs New Zealand : भारताची फिल्डींग संपूर्ण स्पर्धेत दिमाखदार राहिली. मात्र, आजच्या सामन्यात तब्बल तीन झेल सुटले. यामध्येही चित्त्यासारखा झेपावणाऱ्या जडेजाकडूनही रचिन रविंद्रचा झेल सुटला.

धरमशाला : आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा पेपर अवघड का म्हणतात, याचं उत्तर पुन्हा एकदा टीम इंडियाला आज पुन्हा एकदा मिळालं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजी दिली. टीम इंडियाला सलग पाचव्या सामन्यात दमदार सुरुवात मिळाली. न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर अवघ्या 19 धावांमध्ये परतले. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रचिन रविंद्र आणि  डॅरिल मिशेल सामन्याचे चित्र पलटून टाकले. 

दोघांनी सुद्धा दमदार फलंदाजी करताना अर्धशतके झळकावली. आजच्या सामन्यात न्यूझीलंडने मोठी रणनीती अवलंबताना टीम इंडियाची वेगवान गोलंदाजी संयमाने खेळून काढली. मात्र, भारताचं प्रमुख अस्त्र असलेल्या फिरकीवर कडाडून प्रहार केला. त्यामुळे मागील चार सामन्यात किंग राहिलेल्या कुलदीप यादवला सर्वाधिक धावा चोपल्या गेल्या. रविंद्र जडेजावर प्रहार करण्यात आला. आजच्या सामन्यात जडेजाला एकही विकेट मिळाली नाही. कुलदीपच्या पहिल्या पाच षटकांत 48 धावा चोपल्या गेल्या. 

कधी नव्हे ते तीन झेल सुटले 

भारताची फिल्डींग संपूर्ण स्पर्धेत दिमाखदार राहिली. मात्र, आजच्या सामन्यात तब्बल तीन झेल सुटले. यामध्येही चित्त्यासारखा झेपावणाऱ्या जडेजाकडूनही रचिन रविंद्रचा झेल सुटला. त्यामुळे त्याला एक रिव्ह्यू आणि एक झेल असे एकाच षटकांत दोन जीवदान मिळाले. सिराजने त्याला बाद केले, पण रिव्ह्यूची मागणी केल्यानंतर तो पुन्हा यशस्वी ठरला. त्यामुळे आजच्या सामन्यात सर्वाधिक नशीबवान रचिन रविंद्र ठरला. अखेर त्याला शमीने बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. 

मिशेलला दोन जीवदान 

दुसऱ्या बाजूने फलंदाजी करत असलेल्या मिशेलला सुद्धा दोन जीवदान मिळाले. त्याचा अतिशय सोपा झेल पहिल्यांदा विकेटला राहुलने सोडल्यानंतर दुसरा आणखी एक झेल बुमराहने सोडला. त्यामुळे ज्यांनी न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला, त्यांनाच तीन जीवदान मिळाल्याने न्यूझीलंडच्या डावाला आकार आला.  

IND विरुद्ध NZ विश्वचषक स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी (कोणत्याही विकेटवर)

139* - रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल, धर्मशाला, 2023
136 - सुनील गावस्कर आणि क्रिस श्रीकांत, नागपूर, 1987
129* - राहुल द्रविड आणि मोहम्मद कैफ, सेंच्युरियन, 2003
127 - मोहम्मद अझरदुद्दीन आणि सचिन तेंडुलकर, ड्युनेडिन, 1992
116 - एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा, मँचेस्टर, 2019
100 - जॉन राइट आणि ब्रूस एडगर, लीड्स, 1979

ओव्हर समरी (21-30) : टप्पा विजेता - न्यूझीलंड

>> मिशेलने कुलदीपवर दबाव टाकणे सुरूच ठेवले
>> रवींद्रची आणखी एक फिप्टी
>> मिशेल आणि रवींद्रची 100 धावांची भागीदारी केली
>> या WC मध्ये मिचेलचे दुसरे अर्धशतक
>> रवींद्रचा पुन्हा एकदा यशस्वी रिव्ह्यू
>> राहुलकडून विकेटला मिशेलचा कॅच सूटला 

>> रवींद्रला आऊट करण्यात आले पण कॅच बॅकविरुद्ध रिव्ह्यू आणि यशस्वी
>> पॉइंटवर जडेजाने रचिन रवींद्रच्या चेंडूवर एक सोपा झेल सोडला
>> रवींद्र आणि मिशेलने षटकार ठोकल्याने कुलदीपने एका षटकात 16 धावा दिल्या
>> रवींद्र आणि मिशेलकडून न्यूझीलंडच्या डावाची पुनर्बांधणी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Embed widget