एक्स्प्लोर

भारताचा पहिला डाव 107 धावांत गुंडाळला, अश्विनच्या सर्वाधिक धावा

कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जेम्स अँडरसनने तीन, तर ख्रिस वोक्सनं दोन प्रमुख फलंदाजांना माघारी धाडून टीम इंडियाची केविलवाणी अवस्था केली

लॉर्ड्स : इंग्लिश वातावरणात चेंडू करामत दाखवू लागला की, भारतीय फलंदाजांना पळता भुई थोडी होते, याची प्रचिती लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत पुन्हा आली. इंग्लंडच्या जेम्स अँडरसननं वीस धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडून टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 107 धावांत गुंडाळला. ख्रिस वोक्सनं दोन, तर स्टुअर्ट ब्रॉड आणि सॅम करननं प्रत्येकी एकेक विकेट काढून त्याला छान साथ दिली. लॉर्ड्स कसोटीत पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसानं पाणी फेरलं होतं. आज दुसऱ्या दिवशीही पावसानं खेळात वारंवार व्यत्यय आणला. त्याच अवधीत अँडरसननं मुरली विजय (0) आणि लोकेश राहुलला (8) स्वस्तात बाद केलं. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात चेतेश्वर पुजारा (1) धावचीत झाला. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं संयमानं खेळून भारतीय डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ख्रिस वोक्सनं विराट (23)आणि हार्दिक पंड्याचा (11) काटा काढला. अँडरसननं रहाणेला (18) बाद करुन भारताला आणखी एक धक्का दिला. सॅम करननं दिनेश कार्तिकला (1) जेमतेम हजेरी लावू दिली. कुलदीप यादव शून्यावर बाद झाला. आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली असताना, तळाचा फलंदाज आर अश्विन एकटा उभा होता.  भारताकडून सर्वाधिक धावा आर अश्विननेच केल्या. अश्विन 38 चेंडूत सर्वाधिक 29 धावा केल्या. यामध्ये त्याने चार चौकारही लगावले. त्याला स्टुअर्ट ब्रॉडने पायचित केलं. यानंतर मग इशांत शर्मा शून्यावर माघारी परतला, तर मोहम्मद शमी 10 धावा करुन नाबाद राहिला. भारत आणि इंग्लंड संघांमधल्या लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा सारा खेळ पावसात वाहून गेला होता. त्यामुळे नाणेफेकीचा निर्णय महत्वाचा मानला जात होता. भारताने या कसोटीसाठी संघात दोन बदल केले आहेत. सलामीवीर शिखर धवनला वगळून चेतेश्वर पुजाराला तर उमेश यादवला वगळून कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs RR IPL 2026 : आधी ईशानने कुटलं, मग हिंगे-साकिबने पुरतं फोडलं! राजस्थानचा हंगामातील पहिला पराभव; तर हैदराबाद थेट टॉप-4 मध्ये
आधी ईशानने कुटलं, मग हिंगे-साकिबने पुरतं फोडलं! राजस्थानचा हंगामातील पहिला पराभव; तर हैदराबाद थेट टॉप-4 मध्ये
SRH vs RR Score IPL 2026 : प्रफुल्ल अन् शकीबचा तांडव; हैदराबादने राजस्थानचा केला 57 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशी फेल
SRH vs RR Update : प्रफुल्ल अन् शकीबचा तांडव; हैदराबादने राजस्थानचा केला 57 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशी फेल
Who Is Praful Hinge : कष्टाचं चीज झालं... 6 चेंडूत अख्खा गेम पलटवणारा विदर्भाचा पोट्ट्या प्रफुल्ल हिंगे कोण? वैभवसह दोघांना शून्यावर तंबूत धाडलं, सगळेच रेकॉर्ड ब्रेक
कष्टाचं चीज झालं... 6 चेंडूत अख्खा गेम पलटवणारा विदर्भाचा पोट्ट्या प्रफुल्ल हिंगे कोण? वैभवसह दोघांना शून्यावर तंबूत धाडलं, सगळेच रेकॉर्ड ब्रेक
Abhishek Sharma Golden Duck : रोहित शर्मा- संजू सॅमसनचा नकोसा विक्रम आता अभिषेक शर्माच्या नावावर, राजस्थानविरुद्ध नेमकं काय घडलं?
रोहित शर्मा- संजू सॅमसनचा नकोसा विक्रम आता अभिषेक शर्माच्या नावावर, राजस्थानविरुद्ध नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget