एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs BAN, U 19 Final Score : बांगलादेशसमोर भारतीय संघाचं 178 धावांचं आव्हान
आयसीसी 19 वर्षाखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा खेळताना भारताने बांगलादेशसमोर 177 धावांचं आव्हानं ठेवलंय.
पॉटशेफस्ट्रूम : 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत पाकिस्ताच्या संघाला पाणी पाजणाऱ्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात बांगलादेशने कडवी झुंज दिली. अविशेक दास, शोरिफुल इस्लाम यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघ धडपडताना दिसला. परिणामी भारतीय संघाला अवघ्या 177 धावांच आव्हान उभं करता आलंय. नाणेफेक जिंकत बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयाला साजेशी कामगिरी बांगलादेशच्या गोलंदाजांनी केली. भारताकडून यशस्वी जैस्वालने एकाकी झुंज देत 88 धावांची खेळी केली. त्याला तिलक वर्माने 38 धावा करत चांगली साथ दिली.
भारतीय संघाची सुरुवात धडपडतच झाली. बांगलादेशने सुरुवातीपासून आक्रमक गोलंदाजी केली. दिव्यांश सक्सेना आणि यशस्वी जैस्वाल यांच्यावर अंकुश ठेवण्यात बांगलादेशच्या गोलंदाजांना यश आलं. सलामीवीर दिव्यांश सक्सेना झटपट माघारी परतला. यानंतर तिलक वर्मा आणि यशस्वी जैस्वालने दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचत भारतीय संघाचा डाव सावरला. यशस्वी जैस्वालने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं. मात्र, ही जमलेली जोडी शाकीबने तिलक वर्माला बाद करत फोडली आणि भारतीय संघाची पडझड सुरू झाली. ध्रुव जुरेलने मधल्या फळीत यशस्वीला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण, यशस्वी जैस्वालची विकेट पडल्याने संघ अधिकच अडचणीत आला. बांगलादेशकडून अविशेक दासने सर्वाधिक 3, हसन शाकीब आणि शोरिफुल इस्लामने प्रत्येकी 2-2 तर रकीब उल-हसनने एक बळी घेतला.
IND vs NZ : सामन्यासह भारताने मालिका गमावली, जाडेजा-सैनी जोडीची संघर्ष अपयशी
भारतीय संघ - यशस्वी जैस्वाल, दिव्यांशु सक्सेना, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), प्रियम गर्ग (कर्णधार), सिद्धेश वीर, अथर्व अंकोलेकर, रवि बिश्नोई, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी आणि आकाश सिंह.
बांगलादेशचा संघ - परवेज हुसैन, तंजीद हसन, महमूदुल हसन जॉय, तौहीद ह्रदय, शहादत हुसैन, शमीम हुसैन, अविषेक दास, अकबर अली (कर्णधार), रकीबुल हसन, शोरफुल इस्लाम आणि तंजीम हसन सकीब.
Sachin Tendulkar | नवी मुंबईत 'तेंडुलकर मिडलसेक्स'ची क्रिकेट अॅकॅडमी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement