एक्स्प्लोर

अंडर-19 विश्वचषक : टीम इंडियाने चौथ्यांदा वर्ल्डकप पटकावला!

अंडर-19 विश्वचषकावर भारताने चौथ्यांदा नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या 217 धावांचं आव्हान टीम इंडियानं अवघ्या 38.5 षटकातच पूर्ण केलं.

माऊंट मॉन्गानुई/ न्यूझीलंड : अंडर-19 विश्वचषकावर भारताने चौथ्यांदा नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या 217 धावांचं आव्हान टीम इंडियानं अवघ्या 38.5 षटकातच पूर्ण केलं. मनजोत कालरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात कांगारुंवर तब्बल 8 गडी राखून मात केली. मनजोतनं 101 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. भारताने याआधी २०००, २००८ आणि २०१२ साली अंडर नाईन्टिनचा विश्वचषक जिंकला होता. कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोतनं भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र पृथ्वी शॉ 29 धावांवर बाद पण मनजोत कालराने संयमी खेळी करत टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. उपांत्य सामन्यात शतक झळकावणारा शुबमन गिलने देखील मनजोतला चांगली साथ दिली. पण तो 31 धावांवर परम उपलचा बळी ठरला. दरम्यान, या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाला 216 धावाच करता आल्या. जोनाथन मेर्लोच्या ७६ धावांच्या झुंजार खेळी सोडल्यास इतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. या सामन्यात संपूर्ण सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपलं वर्चस्व गाजवलं. भारताच्या ईशान पोरेल, कमलेश नागरकोटी, अनुकूल रॉय आणि शिवा सिंगनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर शिवम मावीनं एक बळी घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

महत्त्वाच्या बातम्या

Harmanpreet Kaur News : वर्ल्ड कप अन् गोल्ड मेडल जिंकल्यानंतरही कर्णधारपदाला रामराम! हरमनप्रीत कौरसोबत गुवाहाटीत नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारी Inside Story
वर्ल्ड कप अन् गोल्ड मेडल जिंकल्यानंतरही कर्णधारपदाला रामराम! हरमनप्रीत कौरसोबत गुवाहाटीत नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारी Inside Story
Harmanpreet Kaur Marathi News: हरमनप्रीत कौरने अचानक टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावूक पोस्ट करत म्हणाली, मला अनेकदा वैयक्तिक पातळीवर किंमत चुकवावी लागली!
हरमनप्रीत कौरने अचानक टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावूक पोस्ट करत म्हणाली, मला अनेकदा वैयक्तिक पातळीवर किंमत चुकवावी लागली!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Embed widget