India vs Australia 2023 World Cup Final : चक दे इंडिया! 20 वर्षांपूर्वीच्या बदल्यासाठी एक निर्णायक 'ठोका' अन् 140 कोटी भारतीयासाठी चिरंतन आठवणींचा 'ठेका'
India vs Australia 2023 World Cup Final : या वर्ल्डकपमध्ये काय घडलं नाही? किंग विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. रोहितने आपल्या बॅटने अक्षरशः कहर केला.
India vs Australia 2023 World Cup Final : तब्बल 20 वर्षांपूर्वीची जाणीव करून देणारी ती एक दुःखद आठवण, त्यानंतर बारा वर्षांनी आलेली मायदेशात आलेली सुवर्णसंधी आणि 140 कोटी भारतीयांचे अपेक्षांचं ओझं घेऊन आज (India vs Australia 2023 World Cup Final) टीम इंडिया वर्ल्डकपच्या मेगाफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करणार आहे. टीम इंडियाचा साखळी सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणक्यापासून सुरु झालेला प्रवास ते फायनल हा जो प्रवास राहिला आहे तो स्वप्नवत, मनमुराद आनंद देणारा आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये अध्याय जोडणारा असाच झाला आहे. प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका 100 टक्के निभावताना टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिलं आहे.
या वर्ल्डकपमध्ये काय घडलं नाही? किंग विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. रोहितने आपल्या बॅटने अक्षरशः कहर केला. श्रेयसवर टीका झाली, मात्र त्यानं कमबॅक करताना जो काही परफॉर्मन्स दिला आहे त्याला तोड नाही. लोकेश राहुलनं जी काही कामगिरी केली आहे ती पाहता त्याला धोनीच्या रांगेमध्ये घेऊन गेली आहे. पहिला वर्ल्डकप पासूनही श्रेयस आणि गिलने आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला आहे.
आजवर टीम इंडियाचा जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा फक्त बॅटिंगची चर्चा होत असते. बॅटिंग किती खोलवर आहे? याची चर्चा होत होती. विराट किती शतक करणार? रोहित किती शतक करणार? याची चर्चा व्हायची. मात्र, या वर्ल्डकपमध्ये जी कामगिरी टीम इंडियाच्या फलंदाजांकडून आणि गोलंदाजांकडून झाली आहे. गोलंदाजीमध्ये टीम इंडियाने निर्माण केलेली दहशत हीच विरोधी संघांसाठी धडकी भरवणारी ठरली आहे.
मोहम्मद शमीच्या रूपात जे वादळ वर्ल्डकपमध्ये आलं त्या वादळामध्ये विरोधी संघ नेस्तनाबूत होऊन गेले आहेत. त्याने केलेल्या कामगिरीमुळे टीम इंडियाला कधी नव्हे ते पुन्हा एकदा मोठी संधी प्राप्त मायदेशात करून दिली आहे. त्याने केलेली कामगिरी निश्चितच क्रिकेटच्या इतिहासामध्येच एक सुवर्णाक्षरांनी नोंद होणार आहे, अशा पद्धतीने त्याची कामगिरी झाली आहे. बुमराहची गोलंदाजी आणि फिरकीमध्ये सुद्धा रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवने दिलेली तोलामोलाची साथ सुद्धा टीम इंडियाला फायनलच्या टप्प्यापर्यंत घेऊन आली आहे.
फक्त वैयक्तिक कामगिरी नव्हे तर सांघिक कामगिरीत सुद्धा टीम इंडियाने तुल्यबळ लढत दिली आहे. त्यामुळेच की काय सर्वच विरोधी संघ नेस्तनाबूत झाले आहेत. ज्या न्यूझीलंडविरुद्ध भारताचा इतिहास कमकुवत होता, ज्या इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा इतिहास कमकुवत होता, त्या दोन्ही संघांना पाणी पाजण्याचं काम याच वर्ल्डकपमध्ये केले आणि नव्याने इतिहास लिहिला. इतिहास हा बदलण्यासाठी असतो हे प्रत्येक सामन्यातील प्रत्येक खेळीवरून टीम इंडियाच्या 11 धुरंदरांनी करून दाखवलं आहे. त्यामुळे एक क्षण आता असा आला आहे जिथे 140 कोटींची एकच अपेक्षा आहे ती म्हणजे पुन्हा एकदा या मायदेशामध्ये बारा वर्षांनी टीम इंडियाने वर्ल्डकप उंचावून एक मनमुराद आनंद अन् चिरंतन आठवणींचा ठेका द्यावा.
निकाल काहीही आला तरी फिर भी दिल है हिंदुस्तानी म्हणून या टीमच्या मागे आपण शंभर टक्के उभा राहिले पाहिजे हे आपलं खेळ भावनेनं पहिलं कर्तव्य आहे. टीम इंडियाने साखळी सामन्यापासून ते पार फायनलपर्यंत जो आनंद दिला आहे जो खेळ केला आहे, जी सांघिक कामगिरी केली आहे तो आनंद कधीही विसरता येणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या