एक्स्प्लोर
Advertisement
इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी कोहलीसमोर नवा पेचप्रसंग
आयर्लंडला दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 ने मात देत भारताने विजयी सुरुवात केली. सर्वच खेळाडूंनी या दोन्ही सामन्यात आपलं योगदान दिलं. मात्र या योगदानामुळे कर्णधार विराट कोहलीसमोर नवा प्रसंग उभा राहिला आहे.
लंडन : टीम इंडियाच्या ब्रिटन दौऱ्याची सुरुवात धमाकेदार झाली. आयर्लंडला दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 ने मात देत भारताने विजयी सुरुवात केली. सर्वच खेळाडूंनी या दोन्ही सामन्यात आपलं योगदान दिलं. मात्र या योगदानामुळे कर्णधार विराट कोहलीसमोर नवा प्रसंग उभा राहिला आहे.
भारताच्या प्रत्येक खेळाडूने आयर्लंडमध्ये स्वतःला सिद्ध केलं. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये नेमकं कुणाला खेळवायचं याचं आव्हान कोहली आणि संघ व्यवस्थापनासमोर आहे.
''अपेक्षेप्रमाणे दौऱ्याची सुरुवात झाली. कुणाला निवडायचं आणि कुणाला नाही याबाबत पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राखीव खेळाडूही चांगलं प्रदर्शन करत आहेत ही चांगली गोष्ट आहे,'' असं विराट कोहली आयर्लंडविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्यानंतर म्हणाला.
इंग्लंड दौऱ्याबाबतही विराटला विचारण्यात आलं. ''प्रतिस्पर्धी संघाशी आम्हाला घेणं देणं नाही. ते आमच्यासाठी अडचण निर्माण करु शकतात, तर आमच्याकडेही चांगली फलंदाजी आहे. सोबतच दोन चांगले फिरकीपटूही आहेत. इंग्लंडविरुद्धची मालिका चांगली होईल,'' असं विराटने सांगितलं.
केएल राहुल, की सुरेश रैना?
कुणाला कुठे आणि कसं खेळवायचं ही विराटसमोरची सर्वात मोठी समस्या आहे. यामध्ये दोन मोठी नावं आहेत, ती म्हणजे लोकेश राहुल आणि सुरेश रैना. दुखापतीनंतर राहुलने त्याच्या जबरदस्त फॉर्मात पुनरागमन केलं आहे. आयपीएलमधील धमाक्यानंतर त्याने आपलं संघातलं स्थान मजबूत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं.
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात राहुलने 36 चेंडूत 70 धावांची वादळी खेळी केली. राहुल या सामन्यात सलामीला उतरला होता, तर शिखर धवनला या सामन्यात बसवून ठेवण्यात आलं होतं. रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर उतरला.
मैदानात आखूड चेंडूवर खेळणं ही सुरेश रैनाची सर्वात मोठी समस्या आहे. आयपीएलमध्येही हेच दिसून आलं. त्याने 19 आखूड चेंडू खेळले, ज्यावर 31 धावा करता आल्या आणि दोन वेळा बादही झाला. तर दुसरीकडे राहुलने 38 आखूड चेंडूवर 127 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 13 षटकारांचा समावेश आहे. रैनाला या चेंडूंमध्ये एकही षटकार मारता आला नाही.
इंग्लंडविरुद्ध रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीला उतरल्यास विराटला राहुलसाठी नवी जागा शोधावी लागेल. राहुलचा फॉर्म पाहता, त्याला मधल्या फळीत संधी देणं हा त्याच्यावर अन्याय असेल, असं जाणकारांचं मत आहे. त्यामुळे या परिस्थितीत मनीष पांडेला वगळलं जाऊ शकतं आणि त्याच्या जागी राहुलचा समावेश केला जाऊ शकतो. सुरेश रैना त्याच्या ऑफ स्पिनने एका चांगला फायदा मिळवून देऊ शकतो, याच्याच बळावर त्याचा संघात समावेश होण्याची आशा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement