एक्स्प्लोर
''धोनीला पर्याय नाही, मात्र युवराजच्या जागेसाठी अनेक दावेदार''
युवराज सिंह इंग्लंडमध्ये 2019 ला होणाऱ्या विश्वचषकाचा दावेदार नाही, असं निवड समितीच्या धोरणांची जाण असलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या वन डे आणि एकमेव टी-20 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महेंद्र सिंह धोनीसह अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहला पुन्हा एकदा वगळण्यात आलं आहे.
2011 च्या विश्वचषकात दमदार कामगिरी करुन मालिकावीर ठरलेला युवराज सिंह गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मातून जात आहे. नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक केल्यानंतर उर्वरित सामन्यांमध्ये युवराज खास कामगिरी करु शकला नाही. सात सामन्यांमध्ये त्याने केवळ 162 धावा केल्या.
युवराज सिंह इंग्लंडमध्ये 2019 ला होणाऱ्या विश्वचषकाचा दावेदार नाही, असं निवड समितीच्या धोरणांची जाण असलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर संबंधित अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली.
युवराजच्या फलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात पहिल्यासारखी चमक राहिलेली नाही. गोलंदाजी तर तो कधी तरी करतो. 2019 च्या विश्वचषकासाठी संघ तयार करायचा असेल, तर आत्तापासूनच निर्णय घ्यावे लागतील. महेंद्र सिंह धोनीसाठी निवड समितीकडे अजूनही पर्याय नाही. मात्र युवराजची जागा घेण्यासाठी अनेक प्रबळ दावेदार आहेत, असं या अधिकाऱ्याने सांगितलं.
युवराजने 304 वन डे 8 हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर त्याने 40 कसोटी सामने आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून युवराज खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून बाहेर आहे. आता श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून वगळून निवड समितीने युवराज 2019 च्या विश्वचषकाचा दावेदार नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement