IND vs SL 1st ODI Score Live : श्रीलंकेची झुंज व्यर्थ, 67 धावांनी पराभव, भारताची मालिकेत 1-0 ची आघाडी
IND vs SL, ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 सामन्यानंतर आता तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून आज पहिला सामना खेळवला जात आहे.
LIVE
Background
IND vs SL 1st ODI: भारतीय संघ (Team India) आज अर्थात 10 जानेवारीपासून (मंगळवार) श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका (India vs Sri Lanka) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिला सामना गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंका संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंचं पुनरागमन झालं असून रोहित, विराट, केएल राहुलसह श्रेयस अय्यर मोहम्मद शमी हे देखील मैदानात उतरणार आहेत.
दोन्ही संघाच्या आजवरच्या एकदिवसीय सामन्यांचा विचार करता भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात आतापर्यंत तब्बल 162 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारतानं यामध्ये 93 सामने जिंकले असून श्रीलंका संघाला 57 सामने जिंकण्यात यश आलं आहे. याशिवाय दोघांमधील एकूण 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसंच एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे या सर्व सामन्यांचा विचार करता भारतीय संघाचा दबदबा श्रीलंकेवर एकदिवसीय सामन्यांमध्ये असल्याचं दिसून येत आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी कसे आहेत दोन्ही संघ?
अशी आहे टीम इंडिया-
रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर),श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, उमरान मलिक, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,म युजवेंद्र चहल
अशी आहे टीम श्रीलंका
पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकिपर), अविष्का फर्नांडो, धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, कसुन रजिथा, दिलशान मदुशंका
भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला एकदिवसीय सामना | 10 जानेवारी | बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी | दुपारी 1.30 वाजता |
दुसरा एकदिवसीय सामना | 12 जानेवारी | ईडन गार्डन्स, कोलकाता | दुपारी 1.30 वाजता |
तिसरा एकदिवसीय सामना | 15 जानेवारी |
ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम |
दुपारी 1.30 वाजता |
कुठे पाहाल सामना?
भारत आणि श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील सर्व सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
हे देखील वाचा-